priya bapat esakal
Premier

'बिग बॉस मराठी ५'मधले आवडते स्पर्धक कोण? प्रिया बापटने घेतली 'या' तिघांची नावं, म्हणाली- 'ते खरे लोक...

Payal Naik

मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना केवळ आपल्या मेहनतीच्या जोरावर तिने मराठी सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. आता प्रिया हिंदी वेबसिरीजही गाजवतेय. मात्र प्रेक्षकांची लाडकी प्रिया बापट मध्येमध्ये बिग बॉसही फॉलो करते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपल्याला बिग बॉस पाहायला आवडत नाही पण ती बिग बॉस मराठी फॉलो करत असल्याचं सांगितलं. सोबतच तिने घरातले तिचे आवडते स्पर्धक कोण आहेत याबद्दलही सांगितलं आहे.

प्रियाचे आवडते स्पर्धक कोण?

प्रियाने नुकतीच लोकमत फिल्मील मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना प्रिया म्हणाली, ''आमच्या घरी कधीकधी बिग बॉस बघितलं जातं. मी अगदी नियमित फॉलो करत नाही. सुरुवातीला मी एपिसोड्स बघितले तेव्हा मला खूप त्रास झाला. सारखी कचकच भांडणं मला आवडत नाही. कधीतरी बघते.' तिला आवडणाऱ्या स्पर्धकांबद्दल विचारणा केली असता प्रिया म्हणाली, ''जितकं मी पाहिलंय त्यात मला पॅडी दादा आवडतो. तसंच अभिजीत, पॅडी दादा आणि अंकिता हे तिघंही आपल्या खऱ्या स्वभावाला आणि मराठी संस्कृतीला जपून खेळतात. ते धज्जियाँ उडवत नाही. निक्की तांबोळी हिंदी बिग बॉस करुन आली आहे त्यामुळे ती तसंच खेळते. कदाचित ती करतेय ते बरोबरच असेल कारण मला तो खेळ फारसा कळत नाही. मला जर तिथे ठेवलं तर मी त्या योगितासारखंच म्हणेन, 'बाबा , मला काढा.''

प्रियाच्या कामाबद्दल सांगायचं तर तिचं 'जर तरची गोष्ट' हे नाटक सध्या रंगभूमीवर आहे. तर नुकताच तिचा 'विस्फोट' हा हिंदी सिनेमा रिलीज झाला. आता ती आगामी 'रात जवाँ है' या हिंदी वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: बाणेरमधील भयंकर प्रकार! बिल्डरची सोसायटीतल्या रहिवाशांना मारहाण, अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न

Sanjay Raut: ...हे बेकायदेशीर! भाजप नवीन कायदे काढत आहे, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंना भेटायला आलेले आदिवासी आमदार वेटींगवर; दुपारी 3 वाजताचा दिला होता वेळ

Video: मैदानातील लाईट्स गेले, २ तास खेळ थांबला अन् मग David Miller च्या वादळानं TKR चा हरवत रॉयल्सला पोहचवलं क्वालिफायर्समध्ये

Latest Marathi News Live Updates : यूपीच्या बरेलीमध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोट

SCROLL FOR NEXT