On 65th birthday Bollywood star Sanjay Dutt unveiling first look of his character Dhak Deva KD - The Devil Sakal
Premier

KD - The Devil : संजय दत्तच्या ‘केडी-द डेव्हिल’ची पहिली झलक; वाढदिवसानिमित्त चित्रपटाचा फर्स्ट लूक लाँच

KD - The Devil sanjay dutt look | अभिनेता संजय दत्त हे बॉलीवूडमधलं एक प्रसिद्ध नाव. त्याने या इंडस्ट्रीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे. अशातच आता तो कन्नड चित्रपटात झळकणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

अभिनेता संजय दत्त हे बॉलीवूडमधलं एक प्रसिद्ध नाव. त्याने या इंडस्ट्रीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे. अशातच आता तो कन्नड चित्रपटात झळकणार आहे. त्याचा लवकरच ''केडी-द डेव्हिल'' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबाबत त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत.

नुकताच त्याने त्याच्या वाढदिवसानिमित्त चित्रपटाचा फर्स्ट लूक लाँच केला आहे. या चित्रपटात तो धक देवाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा भाग बनल्याबद्दल संजय दत्त म्हणाला, ‘केडी-द डेव्हिल’चा भाग बनून मला खूप आनंद होत आहे. कन्नड दिग्दर्शक प्रेम सरांनी चित्रपटाची ज्या प्रकारे कल्पना केली आहे, ते मला खूप आवडलंय.

या चित्रपटात काही दिग्गज लोकांसोबत एकत्र काम करताना मला खूप मज्जा आली.हा चित्रपट १९७० मधील सत्य घटनेवर आधारित आहे. यामध्ये संजय दत्त, शिल्पा शेट्टी, नोरा फतेही, रमेश अरविंद, व्ही. रविचंद्रन आणि ध्रुव सर्जा यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रेम यांनी केले असून केव्हीएन प्रॉडक्शन्सने निर्मिती केली आहे. हा चित्रपट १३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT