Premier

Movie And Web series on OTT: ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका; वीकेंडला घरबसल्या पाहा 'हे' वेब सीरिज आणि चित्रपट

priyanka kulkarni

Movie And Web series on OTT: ओटीटीवर (OTT) विविध विषयांवर आधारित असणारे चित्रपट (Movie) आणि वेब सीरिज (Web series) रिलीज केले जातात. अशातच ओटीटीवर वीकेंडला (Weekend) नेमकं काय बघायचं? हा प्रश्न अनेकांना पडत असेल. हा आठवडा हा सिनेप्रेमींसाठी खास होता. कारण या आठवड्यात काही खास वेब सीरिज आणि चित्रपट ओटीटीवर रिलीज झाले आहेत. हे वेब सीरिज आणि चित्रपट तुम्ही घरबसल्या ओटीटीवर पाहू शकता.

पंचायत-3 (Panchayat Season 3)

पंचायत या वेब सीरिजला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. आता या वेब सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 28 मे रोजी ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. तुम्ही या वीकेंडला पंचायत-3 ही वेब सीरिज ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.

डेढ़ बीघा जमीन (Dedh Bigha Zameen)

अभिनेता प्रतिक गांधीचा डेढ़ बीघा जमीन हा चित्रपट जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. या चित्रपटात प्रतिकसोबतच खुशाली कुमार मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाची कथा अशा एका अशा माणसावर आधारित आहे, ज्याची जमीन सरकारी माणसाने ताब्यात घेतली, त्यानंतर तो व्यवस्थेविरुद्ध लढा देतो.

एरिक ( Eric)

अभिनेता बेनेडिक्ट कंबरबॅचचा एरिक हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज आहे. या सीरिजमध्ये एका बापाची कथा दाखवण्यात आली आहे, जो त्याचा 9 वर्षांचा मुलगा शोधत आहे.

द फर्स्ट ओमेन (The First Omen)

जर तुम्हाला हॉरर चित्रपट बघायला आवडत असेल, तर द फर्स्ट ओमेन हा चित्रपट तुम्ही वीकेंडला बघू शकता. हा चित्रपट 30 मे रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs RSA T20 WC Final : टी 20 वर्ल्डकपच्या इतिहासात फायलनमध्ये यापूर्वी जे झालं नाही ते भारतानं करून दाखवलं

Ind vs Sa T20 WC Final Live Score : हार्दिकने उंचावल्या भारतीयांच्या आशा, अर्धशतक करणारा हेन्रिक क्लासेन आऊट

Zika Virus : झिकाचा धोका! आणखी सहा जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवले; 'अशी' घ्या काळजी

T20 World Cup 2024: टीका झाली, पण भिडू घाबरला नाय! फायनलमध्ये दुबेने दाखवली बॅटची ताकद

Virat Kohli : टी 20 वर्ल्डकपच्या फायनलचा किंग! विराटच्या संथ अर्धशतकानं पकडला वेग, रोहितचा विश्वास ठरवला सार्थ

SCROLL FOR NEXT