pachayat 3 fame vinod suryavanshi
pachayat 3 fame vinod suryavanshi sakal
Premier

इंडस्ट्रीसाठी ज्युनिअर आर्टिस्ट म्हणजे एखादं जनावर; 'पंचायत 3'च्या मराठी सचिवजींनी सांगितलं पडद्यामागचं विदारक सत्य

सकाळ डिजिटल टीम

Vinod Suryavanshi: सध्या सगळीकडे 'पंचायत ३' ची प्रचंड चर्चा आहे. या सीरिजने पुन्हा एकदा सगळ्यांची मनं जिंकली. पंचायतच्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझनप्रमाणे सीझन ३ ने देखील प्रेक्षकांना भुरळ पाडली. मात्र सीझन ३ मध्ये काही नवे चेहरेदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यातील एक म्हणजे सीझनमध्ये झळकणारे गावचे नवे सचिव. सीरिजमध्ये ही भूमिका मराठमोळा अभिनेता विनोद सूर्यवंशी याने साकारली आहे.

विनोद हा मराठी अभिनेता असून तो कधीकाळी सेक्युरिटी गार्डचं काम करायचा. त्याने ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. आता त्याने दिलेली एक मुलाखत चाहत्यांमध्ये व्हायरल होतेय ज्यात त्याने इंडस्ट्रीमध्ये होणाऱ्या भेदभावाबद्दल सांगितलं आहे. ज्युनिअर आर्टिस्टना इथे जनावरासारखं वागवलं जातं असं तो म्हणाला आहे.

अशी असते वागणूक

विनोदने नुकतीच आजतकला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना विनोदने इंडस्ट्रीमध्ये ज्युनिअर आर्टिस्टना कशी वागणूक दिली जाते या बद्दल सांगितलं आहे. याबद्दल बोलताना विनोद म्हणाला, 'हो, ज्युनिअर आर्टिस्टना जनावरांसारखं वागवलं जातं हे अगदी खरं आहे. इंडस्ट्रीमध्ये त्यांच्यासाठी एक वेगळी सिस्टम आहे. त्यांच्यासोबत वाईट वागतात. त्यांच्यासोबत नीट बोलत नाही. त्यांना नीट वागवलं जात नाही. जे मोठ्या पदावरचे लोक आहेत ते चांगली वागणूक देत नाहीत. त्यांना एका बाजूला टाकलं जातं. घाणेरड्या भाषेत बोलतात. शिवीगाळ केली जाते. अशी सिस्टीम आहे.'

कशी आहे जेवणाची पद्धत

पुढे बोलताना विनोद म्हणाला, 'जेवणाची पद्धतही तशीच असते. त्यांचं जेवण वेगळं येतं. तिथे तीन क्रू असतात. ए, बी आणि सी. ज्युनिअर आर्टिस्ट सीमध्ये येतात. मग त्यांच्यासाठी वेगळं जेवण येतं. या क्रू मध्ये खूप लोक असतात त्यामुळे कधीकधी जेवणही नाही उरत. हे सगळं मी पाहिलंय, सहन केलंय. मी या सगळ्यातून गेलोय जेव्हा मी ज्युनिअर आर्टिस्टचं काम करायचो. या कामात एका दिवसाचे ५०० किंवा हजार रुपये मिळतात. कधी काम असतं कधी नसतं. खूप अडचणी असतात.' विनोद सध्या 'पंचायत चे नवीन सचिव म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सूर्यानं झेल घेतला नसता तर रोहित शर्मानंच नाहीतर आम्ही पण...; अजित पवारांनी केली मिश्किल टिप्पणी

Rohit Sharma : बरं झालं सूर्याच्या हातात कॅच बसला नाहीतर... विधान भवनात रोहितची मराठीतून फटकेबाजी

Maharashtra Live News Updates : आम्ही देखील जीव मुठीत धरून बसलो होतो - देवेंद्र फडणवीस

Rishabh Pant: "तुम्ही माझ्या आईला फोन केला अन्..."; PM मोदींसोबत बोलताना ऋषभ पंतने व्यक्त केल्या भावना

Lalu Yadav: ऑगस्टपर्यंतच चालणार मोदी सरकार; लालू प्रसाद यादव यांचा दावा

SCROLL FOR NEXT