पंकज त्रिपाठी नाही तर 'हा' अभिनेता साकारणार होता गँग्स ऑफ वासेपूरमधील 'सुलतान'; पडद्यामागील राजकारणाबद्दल स्वत: सांगितलं
Gangs of Wasseypur sakal
Premier

Gangs of Wasseypur: पंकज त्रिपाठी नाही तर 'हा' अभिनेता साकारणार होता गँग्स ऑफ वासेपूरमधील 'सुलतान'; पडद्यामागील राजकारणाबद्दल स्वत: सांगितलं

priyanka kulkarni

Gangs of Wasseypur: गँग्स ऑफ वासेपूर (Gangs of Wasseypur) हा चित्रपट आजही लोक आवडीनं बघतात. या चित्रपटातील सीन्स आणि या चित्रपटातील डायलॉग्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं देखील अनेकांनी कौतुक केलं. अशातच आता या चित्रपटाबद्दल एका अभिनेत्यानं खुलासा केला आहे. या अभिनेत्याला मुलाखतीमध्ये गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटातील 'सुलतान' या भूमिकेविषयी विचारण्यात आलं. या प्रश्नाला त्या अभिनेत्यानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधलं.

पंकज त्रिपाठी नाही तर 'हा' अभिनेता साकारणार होता गँग्स ऑफ वासेपूरमधील 'सुलतान'

गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटातील 'सुलतान' ही भूमिका अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी साकारली. पण ही भूमिका आधी अभिनेते पंकज झा हे साकारणार होते. याबाबत पंकज झा यांनी एका मुलाखतीत सांगितली आहे.

"गँग्स ऑफ वासेपूरमध्ये आधी तुम्ही सुलतान हे कॅरेक्टर साकारणार होता पण नंतर ती भूमिका दुसऱ्या अभिनेत्याला देण्यात आली, हा राजकारणाचा भाग आहे, असं तुम्हाला वाटतं का?", असा प्रश्न मुलाखतीत पंकज झा यांना विचारण्यात आला. याच्याबद्दल पंकज झा म्हणाले, "माझ्या मागे काय राजकारण सुरु आहे, याचा मला काही फरक पडत नाही. लोकांच्या मागे राजकारण करणे हे भ्याडपणा करण्यासारखं आहे. या राजकारणाचा जर माझ्यावर परिणाम झाला तर तो राजकारण करणारा जिंकतो."

पंकज झा हे सध्या त्यांच्या पंचायत या वेब सीरिजमुळे चर्चेत आहेत. पंकज झा यांनी ब्लॅक फ्रायडे, गुलाल आणि चमेली या चित्रपटात त्यांनी काम केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: वसंत मोरेंच्या पक्षप्रवेशावर प्रकाश आंबेडकरांनी बोलणं टाळलं! म्हणाले, 'आयाराम गयारामचं जे राजकारण...'

IND vs ZIM T20 Series : बोर्डाने केली मोठी घोषणा! टी-20 मालिकेच्या 1 दिवसआधी संघांला मिळाला नवीन कोच

Congress: भाव वाढला! लोकसभेत 99 जागा जिंकलेल्या काँग्रेसमध्ये 6 आमदारांचा प्रवेश

RBI Action: आरबीआयने आणखी एका बँकेला ठोकलं टाळं; पैसे काढता येणार की नाही? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Live News Updates : उद्योगाबाबत श्वेतपत्रिका काढली जाईल- अजित पवार

SCROLL FOR NEXT