pandharichi wari  sakal
Premier

'पंढरीची वारी' चित्रपटातील ते कलाकार ज्यांना कधी वारी पावलीच नाही; कुणाचा अपघात तर कुणाला आजारपण, बालकलाकारसुद्धा...

Payal Naik

प्रत्येक आषाढी एकादशीला प्रेक्षकांना ज्या चित्रपटाची आवर्जून आठवण येते तो चित्रपट म्हणजे 'पंढरीची वारी'. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन इतकी वर्ष उलटली तरी या चित्रपटाची जादू मुळीच कमी झालेली नाही. प्रेक्षक मोठ्या आवडीने हा चित्रपट पाहतात. कोणत्याही चॅनेलवर हा चित्रपट लागला तरी प्रेक्षक टीव्हीसमोर ठाण मांडून बसतात. मात्र या चित्रपटातील काही कलाकारांना या चित्रपटाचा अर्ध्यातूनच निरोप घ्यावा लागला होता. चित्रपटातील मुख्य कलाकारांपैकी अनेकांनी या जगाचा निरोप घेतलाय.

pandharichi wari

'पंढरीची वारी' हा चित्रपट आधी अभिनेत्री रंजना आणि अभिनेते अरुण सरनाईक यांना घेऊन बनवण्यात येत होता. या चित्रपटाचं तब्बल ७० टक्के शूटिंग पूर्ण झालं होतं. मात्र या चित्रपटाच्या शूटिंग वरून परतत असताना रंजना आणि अरुण सरनाईक यांच्या गाडीचा फार मोठा अपघात झाला. या अपघातात अरुण सरनाईक यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टी हादरली. तर रंजना यांना कायमचं अपंगत्व आलं. त्यानंतर निर्मात्यांनी रंजना यांच्या बरं होण्याची फार वाट पाहिली. मात्र शेवटपर्यंत त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकल्या नाहीत. शेवटी त्यांची परवानगी घेऊन निर्मात्यांनी त्यांच्या जागी जयश्री गडकर आणि बाळ धुरी यांना कास्ट केलं.

pandharichi wari

पुढे चित्रपट पूर्ण झाल्यानंतर या चित्रपटाने सगळ्यांची मनं जिंकली. मात्र पुढे शिक्षण सुरू असताना या चित्रपटातील बालकलाकाराचा मृत्यू झाला. या चित्रपटात विठोबाची भूमिका बालकलाकार बकुल कवठेकर याने साकारली होती. त्याने एक वाक्यही न बोलता आपल्या हावभावांनी सगळ्यांवर छाप पाडली. चित्रपटानंतर त्याने पुण्यातफाईन आर्टसचं शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला. परंतु, २००२ मध्ये त्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ही बातमीदेखील सगळ्यांना चटका लावून गेली. या चित्रपटातील बहुतांश कलाकारांचं आता निधन झालं आहे.

pandharichi wari

या चित्रपटातील जयश्री गडकर, राजा गोसावी, आशा पाटील, दीनानाथ तकलकर, अनुप जलोटा यांचं निधन झालं आहे. तर चित्रपटाच्या कलाकारांपैकी बाळ धुरी, अशोक सराफ, नंदिनी जोग केवळ या जगात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT