Parineeti Chopra esakal
Premier

Parineeti Chopra: प्रेग्नन्सीच्या चर्चेवर अखेर परिणीतीनं सोडलं मौन; पोस्ट शेअर करत म्हणाली...

priyanka kulkarni

Parineeti Chopra: अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) ही सध्या तिच्या चमकीला (Chamkila) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. चमकीला या चित्रपटाचा ट्रेलर काल (28 मार्च) रिलीज झाला. या चित्रपटातील दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) आणि परिणीतीच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले. चमकीला या चित्रपटाचा ट्रेलर लाँच इव्हेंट काल पार पडला. या इव्हेंटसाठी परिणीतीनं खास लूक केला होता. ट्रेलर लाँच इव्हेंटमधील परिणीतीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर तिच्या प्रेग्नन्सीची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. अशताच आता परिणीतीनं तिच्या प्रेग्नन्सीच्या चर्चेवर मौन सोडलं आहे.

परिणीतीनं शेअर केली पोस्ट

परिणीतीनं चमकीला या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच इव्हेंटसाठी ब्लॅक कफ्तान आणि मोकळे केस असा लूक केला होता. परिणीतीचे ट्रेलर लाँच इव्हेंटमधील फोटो व्हायरल झाल्यानंतर तिच्या प्रेग्नन्सीची चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली. त्यानंतर प्रेग्नन्सीच्या चर्चेबाबत परिणीतीनं एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, "कफ्तान ड्रेस= प्रेग्नन्सी,ओव्हर साईज शर्ट= प्रेग्नन्सी,कंफी इंडियन कुर्ता= प्रेग्नन्सी" परिणीतीनं या पोस्टमध्ये लाइफ्ट इमोजी देखील शेअर केला आहे. आता परिणीतीनं ही पोस्ट शेअर करुन तिच्या प्रेग्नन्सीची अफवा पसरवणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.

Parineeti Chopra

कधी रिलीज होणार परिणीतीचा चमकीला चित्रपट?

परिणीती आणि दिलजीतचा चमकीला हा चित्रपट 12 एप्रिल रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 'लव्ह आज कल', 'रॉकस्टार' आणि 'तमाशा' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या इम्तियाज अली यांनी चमकीला चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. चमकीला हा चित्रपट अमरसिंग चमकीला या पंजाबी गायक आणि संगीतकार यांच्यावर आधारित असणार आहे.

परिणीतीनं गेल्या वर्षी राघव चढ्ढा यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. परिणीती आणि राघव चढ्ढा यांचा विवाह सोहळा उदयपूरमध्ये पार पडला. त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT