Kangna Ranaut 
Premier

Kangna Ranaut: कानशिलात लगावल्याच्या घटनेवर कंगनाचं स्पष्टीकरण; म्हणाली, पंजाबमध्ये दहशतवाद वाढतोय...

Amit Ujagare (अमित उजागरे)

चंदीगड : नवनिर्वाचित खासदार कंगना राणावत हीला चंदीगड विमानतळावर एका सीआयएसएफच्या महिला सुरक्षा रक्षकानं कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर कंगनानं एका व्हिडिओद्वारे या घटनेवर भाष्य केलं आहे. आपण सुखरुप असल्याचं सांगत तिनं एक सवालही उपस्थित केला आहे. पंजाबमध्ये वाढणाऱ्या दहशतवादावर नियंत्रण कसं आणणार? याची मला काळजी वाटतेय असं तिनं म्हटलं आहे. (PM Kangna Ranaut slapped incident she said how you handle of growing terrorism in Punjab)

नेमकं घडलं काय?

चंदीगड विमानतळावरुन दिल्लीकडं निघालेल्या कंगनाला सिक्युरिटी चेक दरम्यान तिथल्या एका महिला सुरक्षा रक्षकानं (कुलविंदर कौर) कानशिलात लगावली. असं कृत्य करण्यामागचं कारणंही या महिला सुरक्षा रक्षकानं सांगितलं. तिनं म्हटलं की, "कंगना राणावत हीनं जेव्हा पंजाबमधील शेतकरी आंदोलन करत होते तेव्हा त्यांना खलिस्तानी संबोधलं होतं. ज्यावेळी कंगनानं हे विधान केलं तेव्हा त्या आंदोलकांमध्ये माझी आई देखील होती"

कंगनाच्या पंजाबच्या आंदोलक शेतकऱ्यांबाबत केलेल्या या विधानाचा राग मनात असल्यानचं सीआयएसएफच्या त्या महिला सुरक्षा रक्षकाला कंगनाला विमानतळावर बघताच राग अनावर झाला आणि तिनं कंगनाच्या कानशिलात लगावली.

दरम्यान, कुलविंदर कौर हीला निलंबित करण्यात आलं असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे.

कंगनानं काय दिलं स्पष्टीकरण?

दरम्यान, या प्रकारानंतर कंगनानं एका व्हिडिओद्वारे आपल्यासोबत नेमकं काय घडलं? हे सांगितलं. तिनं म्हटलं की, "मला मीडिया आणि माझ्या शुभचिंतकांकडून अनेक फोन कॉल्स आले आहेत. त्यांना मला सांगायचं आहे की मी पूर्णपणे सुरक्षित आहे. आज चंदीगड विमानतळावर जी घटना घडली ती सिक्युरिटी चेकदरम्यान घडली.

जेव्हा मी तपासणीनंतर पुढे निघाले तेव्हा दुसऱ्या केबिनमध्ये एक सीआयएसएफची महिला सुरक्षा रक्षक होती, तिनं मला पुढे जाऊ दिलं आणि माझ्या चेहऱ्यावर चापट मारली आणि शिवीगाळ केली. यानंतर मी त्या महिलेला विचारलं की त्यांनी असं का केलं? तर तिनं सांगितंल की, शेतकरी आंदोलनाची ती समर्थक आहे. पण मला काळीज याची वाटतेय की, पंजाबमध्ये जो दहशतवाद वाढतो आहे त्याला तुम्ही कशा पद्धतीनं हाताळणार आहात?"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : जम्मू काश्मीर राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मंजूर

SCROLL FOR NEXT