Anupam Kher
Anupam Kher  Esakal
Premier

Anupam Kher Robbery Case : अनुपम यांच्या ऑफिसमध्ये चोरी केल्याबद्दल दोन जणांना अटक

सकाळ डिजिटल टीम

अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांच्या ऑफिसमध्ये चोरी झाल्याचं प्रकरण सध्या खूप गाजतंय. काही दिवसांपूर्वी त्यांच्या ऑफिसमधून काही रक्कम चोरीला गेली आणि त्यांनी निर्मिती केलेल्या सिनेमाची निगेटिव्ह खराब करण्यात आल्याची माहिती अनुपम यांनी दिली होती आता या प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

एएनआयने केलेलं ट्विट

एएनआयने (ANI) केलेल्या ट्विटनुसार, पोलिसांनी अनुपम खेर यांच्या ऑफिसमध्ये झालेल्या चोरीप्रकरणी दोन व्यक्तींना अटक केली आहे. माजिद शेख आणि मोहम्मद दलेर बहिरम खान अशी या व्यक्तींची नावं असून ओशिवरा पोलिसांनी या दोघांना अनुपम यांच्या ऑफिसमधून ४.१५ लाख रुपयांची रोकड चोरल्याप्रकणी अटक केलीआहे . या आधीही या दोन्ही व्यक्तींवर विविध परिसरात दरोडा आणि चोरी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ट्विट करत दिली अनुपम यांनी चोरीची माहिती

एक्स या शोष मीडियावर ट्विट करत अनुपम यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये चोरी झाल्याची माहिती दिली. ते म्हणाले,"काल रात्री माझ्या वीरा देसाई रोडच्या ऑफिसमध्ये दोन चोरट्यांनी माझ्या ऑफिसचे दोन दरवाजे तोडून अकाऊंट्स विभागातील संपूर्ण तिजोरी (जो कदाचित तो तोडू शकला नसावा) आणि आमच्या कंपनीने बनवलेल्या चित्रपटाचे निगेटिव्ह जे एका बॉक्समध्ये होते ते चोरून नेले. आमच्या कार्यालयाने एफआयआर दाखल केला आहे आणि ते दोघेही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बसलेले दिसले आहेत पोलिसांच्या येण्याआधीच लोकांनी हा व्हिडिओ दिला होता!"

पोलिसांची माहिती

आंबोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेर यांच्या कार्यालयातून चोरी झालेल्या तिजोरीत सुमारे चार लाख पंधरा हजार रुपयांची रक्कम होती. तर सिनेमाची निगेटिव्ह एका खोक्यात होती. सीसीटीव्ही चित्रणात चोर हे सामान घेऊन एका रिक्षात बसताना दिसत आहेत. सोशल मीडियावरही हा व्हिडीओ चर्चेत होता. पोलिसांच्या उत्तम तपासामुळे चोरांना पकडण्यात यश आलं.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अनुपम यांच्या ऑफिसमध्ये रात्री जबरदस्ती घुसून चोरी केली होती. तिजोरी उघडता न आल्यामुळे ती उचलून नेण्याचा प्रयत्न चोरांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Victory Parade: विश्वविजेत्या खेळाडूंना जवळून डोळे भरुन पाहण्यासाठी तो चक्क उंच झाडावर बसला जाऊन; व्हिडिओ व्हायरल

Team India Arrival : चाहत्यांच्या जनसागरात हरवली टीम इंडिया! दिवसाची सुरूवात रोहितनं तर शेवट केला हार्दिकनं

Victory Parade: जनसागरातही मुंबईकरांना समाजभान! चाहत्यांनी क्षणात करून दिली रूग्णवाहिकेला वाट

मोठी ब्रेकिंग! गुळवंचीत वीजेचा शॉक लागून 24 म्हशींचा मृत्यू; ओढ्याच्या पाण्यातच पडली वीजेची तार

Natasa Stankovic post viral :देवा माझं रक्षण कर... पांड्या मायदेशी परतताच पत्नी नताशाचा क्रिप्टिक मेसेज

SCROLL FOR NEXT