marathi actresses first vat pornima
marathi actresses first vat pornima  sakal
Premier

Vat Purnima: सात जन्म हाच जोडीदार हवा! लग्नानंतर पहिल्यांदाच वटपौर्णिमा साजरी करणार 'या' मराठी अभिनेत्री

सकाळ डिजिटल टीम

२१ जून रोजी वटपौर्णिमा आहे. सात जन्म हाच जोडीदार मिळावा यासाठी महिला दरवर्षी वडाच्या झाडाची पूजा करतात. हा दिवस सुवासिनींचा असतो. गेल्या वर्षभरात अनेक अभिनेत्री लग्नबंधनात अडकल्या. या मराठी अभिनेत्री यावर्षी पहिल्यांदाच वडाची पूजा करणार आहेत.

पूजा सावंत

अभिनेत्री पूजा सावंत यावर्षी लग्नबंधनात अडकली. ती यावर्षी तिची पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहे.

तितिक्षा तावडे

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' फेम अभिनेत्री तितिक्षा तावडेदेखील याच वर्षी विवाहबद्ध झाली. ती यावर्षी पहिल्यांदाच वडाची पूजा करणार आहे.

शिवानी सुर्वे

अभिनेत्री शिवानी सुर्वे अभिनेता अजिंक्य ननावरे याच्यासोबत विवाह बंधनात अडकली. तिची ही पहिलीच वटपौर्णिमा आहे.

गौतमी देशपांडे

अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने कन्टेन्ट क्रिएटर स्वानंद तेंडुलकरसह २५ डिसेंबर २०२३ रोजी लग्नगाठ बांधली. आता गौतमी तिची पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहे.

स्वानंदी टिकेकर

अभिनेत्री स्वानंदी टीकेकर व गायक आशिष कुलकर्णी २५ डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले. अगदी थाटामाटात स्वानंदी-आशिष यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. यावर्षी स्वानंदी तिची पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहे.

सुरुची आडारकर

अभिनेत्री सुरुची अडारकर व अभिनेता पियुष रानडे यांनी ६ डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकली. सुरुची यावर्षी पहिल्यांदाच वडाची पूजा करणार आहे.

मुग्धा वैशंपायन

गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे यांनी २१ डिसेंबर २०२३ रोजी लग्नगाठ बांधली. ही मुग्धाची पहिली वटपौर्णिमा आहे.

अमृता देशमुख

अमृताने प्रसादसोबत १८ नोव्हेंबर २०२३ रोजी विवाह केला. अमृतादेखील तिची पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहे.

सोनल पवार

'रमा राघव' फेम अभिनेत्री सोनल पवार हिने देखील २०२३ मध्ये लग्न केलं. ती देखील या वर्षी पहिल्यांदाच वटपौर्णिमा साजरी करणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: आज शेअर बाजारात कोणते शेअर्स असतील तेजीत? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

T20 World Champions To Return Home : विश्‍वविजेत्या भारतीय संघाचे आज आगमन; चाहते स्वागतासाठी सज्ज

गोविंद पानसरेंच्या खुनात सनातन संस्थेचा सहभाग? ATS च्या तपासावर पानसरे कुटुंबाची नाराजी, 68 पानी लेखी निवेदन सादर

NCP Meeting: भाजपचा तीव्र विरोध असूनही तो आमदार अजित पवारांच्या बैठकीला उपस्थित; महायुतीत खडाजंगीची शक्यता!

Maharashtra Live News Updates : मान्सूनने संपूर्ण देश व्यापला; पुढील 3 दिवसांत कोकण, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT