Phullwanti Box Office  esakal
Premier

Box Office Collection: 'फुलवंती' की 'येक नंबर', चार दिवसात कुणी किती केलीये कमाई? वाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन

Phullwanti And Yek Number Movie Box Office Collection: गेल्या आठवड्यात दोन मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. यात कोणत्या चित्रपटाला प्रेक्षकांनी कसा प्रतिसाद दिलाय हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.

Payal Naik

Phullwanti Movie: मराठी सिनेसृष्टीतील दोन मोठ्या अभिनेत्रींच्या बॅनरखाली बनलेले दोन मोठे सिनेमे गेल्या आठवड्यात म्हणजेच १० ऑक्टोबर २०२४ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाले. पहिला अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिची निर्मिती असलेला 'येक नंबर' आणि दुसरा प्राजक्ता माळीची निर्मिती असलेला 'फुलवंती'. तेजस्विनी आणि प्राजक्ता या दोन्ही गाजलेल्या अभिनेत्रींच्या दोन्ही सिनेमांची एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर लढत झाली. त्यानंतर आता पहिल्या आठवड्यात या चित्रपटांनी किती कमाई केलीये हे पाहूया.

'येक नंबर' ने किती केली कमाई

'येक नंबर' या चित्रपटात धैर्य घोलप आणि सायली पाटील मुख्य भूमिकेत आहेत. पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी या चित्रपटाने १७ लाखांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी चित्रपटाची कमाई खाली घसरली होती. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ९ लाखांची कमाई केली. तर तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा वर येत चित्रपटाने १६ लाखांची कमाई केली. दसऱ्याच्या दिवशीच्या सुट्टीचा या चित्रपटाला फायदा झाला. तर चौथ्या दिवशी चित्रपटाने १६ लाखांची कमाई केली असल्याचा अंदाज लावला जातोय. त्यावरून या चित्रपटाने चार दिवसात एकूण ५८ लाखांची कमाई केली आहे. तर 'फुलवंती'ने या चित्रपटाला पिछाडीवर टाकलं आहे.

'फुलवंती'ने किती केली कमाई

प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांच्या अभिनयाने सजलेला 'फुलवंती' हा चित्रपट स्नेहल तरडे हिने दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ८ लाखांची कमाई केली होती. मात्र दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने मोठी उडी मारत तब्बल ३६ लाखांची कमाई केली. दसऱ्याच्या दिवशी चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. दसऱ्याच्या दिवशी या चित्रपटाने तब्बल ७५ लाखांची कमाई केली आहे. त्यामुळे तीन दिवसात या चित्रपटाची कमाई १ कोटी १९ लाखांच्या वर पोहोचलीये. तर रविवारी देखील या चित्रपटाने चांगली कामगिरी केली असेल असा अंदाज लावला जातोय. 'फुलवंती'ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे 'फुलवंती'ने बॉक्स ऑफिसवर 'येक नंबर' ला मागे टाकलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: आज शेअर बाजार राहणार बंद; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही ट्रेडिंग होणार नाही

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Sweet Potato Patties: सकाळी नाश्त्यात बनवा चटपटीत रताळं पॅटिस, जाणून घ्या रेसिपी

Congress : समाजात फूट पाडण्यासाठीच भाजपने कलम 370 चा मुद्दा जिवंत ठेवलाय, खर्गेंचा हल्लाबोल

Satara Assembly Election : संदेश, रिल्स पाहताना सावधानता बाळगा...एपीके फाइलवर क्लिक नको, अन्यथा बँक खाते होईल रिकामे

SCROLL FOR NEXT