Prajakta Gaikwad esakal
Premier

Prajakta Gaikwad: दाक्षिणात्य चित्रपटात प्राजक्ता मुख्य भूमिकेत; सिनेमा प्रदर्शित होताच सांगितला अनुभव, म्हणाली...

सकाळ वृत्तसेवा

मुंबईः मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने आता दाक्षिणात्य चित्रपटात जबरदस्त मुख्य भूमिका साकारली आहे. तिचा हा ‘गुगल आई’ चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

याबाबत प्राजक्ता म्हणाली, ‘‘मराठी कलाकार म्हणून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करण्याचा अनुभव खूपच रोमांचक आणि अभिमानास्पद आहे. या चित्रपटात मी कल्याणी नावाची धाडसी स्त्री साकारत आहे, जी कोणालाही घाबरत नाही. जेव्हा कुटुंबावर संकट येतं, तेव्हा ती खंबीरपणे उभी राहते आणि प्रत्येक गोष्टीला धाडसाने सामोरे जाते.

चित्रपटात रोमँटिक, सॅड आणि फॅमिली गाणी आहेत. ‘मन रंगले’ हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांना खूप आवडलं आहे. दिग्दर्शक गोविंद विराह यांनी माझं आधीचं काम पाहून मला या चित्रपटात अभिनयाची संधी दिली. या चित्रपटात साउथ स्टाईलचे भारी फाइट सिक्वेन्स आहेत, जे भारतातील सर्वोत्तम फाइट मास्टर्सनी चित्रित केले आहेत.

प्राजक्ता पुढे म्हणते, साउथच्या कलाकारांसोबत काम करताना त्यांची शिस्त, क्रिएटिव्हिटी आणि प्रोफेशनॅलिझम अनुभवायला मिळाले. मी तीन दिवस चिखलात शूट केलं, पण चित्रपट तयार झाल्यावर खूप आनंद होतोय. प्रेक्षकांनी प्रोमो आणि गाणी खूप पसंत केली आहेत. मी ‘गुगल आई’ची मुख्य भूमिका साकारत आहे.

सहावारी साडीत फाइट सिक्वेन्स आहे, जे प्रेक्षकांना आवडेल. महिला आणि तरुणींना ही भूमिका खूप प्रेरणादायी वाटेल. विशेष म्हणजे या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा समावेश असल्याचेही प्राजक्ता हिने सांगितले. या चित्रपटाचे दिवाकर रेड्डी निर्माते आणि किसन सागर डीओपी आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

Arjun Tendulkar ची भेदक गोलंदाजी; एकाच सामन्यात ९ विकेट्स घेत संघाला डावाने जिंकवलं; पाहा Video

महामंडळाचा प्रसाद फक्त शिंदे गटाला? हेमंत पाटलांसह संजय शिरसाटांवर नवी जबाबदारी; नाराज आमदारांचे राजकीय पुनर्वसन

SCROLL FOR NEXT