phullwanti esakal
Premier

Phullwanti Trailer: एकदा पाहा, नजर हटणारच नाही! प्राजक्ताच्या 'फुलवंती'चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित; कलाकारांच्या लूकने वेधलं लक्ष

Payal Naik

लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिच्या 'फुलवंती' चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनी वाट पाहत आहेत. ११ ऑक्टोबरपासून हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दोन दिवसांपूर्वीच या चित्रपटाची स्टार कास्ट समोर आली होती. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. प्राजक्ताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा ट्रेलर शेअर केला. काही मिनिटातच हा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकरीही त्यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. तर व्हिडिओवरून अनेकांची नजर हटत नाहीये.

या ट्रेलरच्या सुरुवातीलाच आपल्याला पायाला घुंगरू बांधणारी फुलवंती दिसते. तिच्या कार्यक्रमासाठी राजे महाराजेदेखील रंग लावून उभे आहेत. तिने नुसता झटका दिला तरी घरातला कुंकवाचा करंडा थरथरतो असं वाक्य आहे. तिची तालासुरावर पक्की हुकूमत आहे. अख्ख्या हिंदुस्थान गाजवणारी फुला आता पूण्याला आपल्या नादाला लावायला आलीये. या व्हिडिओमध्ये हास्यजत्रेमधील अनेक कलाकार दिसत आहेत. वनिता खरात, चेतना भट्ट, प्रसाद ओक, स्नेहल तरडे यांचा लूक लक्ष वेधून घेतोय. त्यानंतर आपल्याला वेदान्तसूर्य व्यंकट शास्त्री यांचं दर्शन होतं. इथून फुला व्यंकट शास्त्रींनी आपला नाच पाहावा यासाठी प्रयत्न करताना दिसतेय.

आता तालासुरावर हुकूमत असणारी फुलवंती व्यंकट शास्त्रींना आपल्या नाचणे मोहवणार का हे चित्रपटातच समजेल. मात्र या व्हिडिओवरून चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांची उत्कंठा आणखीनच वाढली आहे. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या अजरामर कादंबरीवर आधारित 'फुलवंती' ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट स्वतः प्राजक्ता माळीच्या प्रोडक्शन हाउस मध्ये तयार होतोय. मंगेश पवार अँड कंपनी आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित या चित्रपटात प्राजक्तासोबत गश्मीर महाजनी मुख्य भूमिकेत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lebanon Pager Blast: वायनाडच्या शिंप्याचा मुलगा नोर्वेत कसा पोहचला? का चर्चेत आहे जोस टेलर

Latest Marathi News Updates : उच्च न्यायालयायाचा मोठा निर्णय! मुंबई सिनेटची निवडणुक उद्याच होणार

Ruturaj Gaikwad: फिल्डिंगमध्येही दिसला ऋतुचा 'राज', डाव्या हाताने भारी कॅच पकडत रियान परागला धाडलं माघारी

IND vs BAN, 1st Test: 'बॅड लाईट'मुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, भारताला विजयासाठी ६ विकेट्सटची गरज

OYO Hotels: आता अमेरिकेत सुद्धा होणार ओयोची हवा! 43 अब्ज रुपये गुंतवून घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT