prashant damle on vijay kadam death  esakal
Premier

Vijay Kadam: तो आजारी होता हे... विजय कदम यांच्या निधनाने प्रशांत दामले भावुक, प्रतिक्रिया देत म्हणाले-

Payal Naik

Vijay Kadam Death: गेले दीड वर्ष कर्करोगाशी झुंज देणारे लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांनी आज १० ऑगस्ट रोजी या जगाचा निरोप घेतला. त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. अंधेरी येथे राहत्या घाई त्यांचं निधन झालं. ही बातमी कळताच सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांकरून हालहाल व्यक्त केली जातेय. लोकप्रिय अभिनेते प्रशांत दामले यांनीही त्यांच्या निधनावर प्रतिक्रिया देत शोक व्यक्त केला आहे.

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत म्हणाले,'ही दुःखद आणि धक्कादायक बातमी आहे. तसा तो आजारी होता. पण इतक्या लवकरच निधन होईल असं वाटतं नव्हतं. परवापर्यंत आम्ही भेटत होतो, बोलत होतो. पहिल्यांदाच मला अभिनय शिकण्याची संधी त्याच्याकडेच मिळाली. १९८३मध्ये मी पहिल्यांदा ‘टूरटूर’ नाटकात काम केलं होतं. त्यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे आणि विजय कदम यांची जोडी सुपरहिट होती. त्यांना बघत बघत आम्ही शिकत होतो. मी असो विजय चव्हाण असो, प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर, आम्ही लक्ष्मीकांत बेर्डे आणि विजय कदम यांना बघून शिकत होतो. विजय कदम खूपच भारी होता.'

ते पुढे म्हणाले, 'त्याची भाषाशैली उत्तम होती. त्याची रिअ‍ॅक्शनची स्टाइल छान होती. मुळात तो सहाय्यक कलाकारांना खूप पाठिंबा देणारा कलाकार होता. तो फारच लवकर गेला असं मला वाटतं. खरंच खूप दुःखदायक आहे. आमच्या आठवणी तशा खूप आहेत. पहिला चित्रपट मी त्याच्याबरोबर केला होता आणि कसं होतं, आपण नाटकात ज्या रिअ‍ॅक्शन देतो, तशाच पद्धतीच्या रिअ‍ॅक्शन चित्रपटात द्यायच्या नसतात. ते मला त्याने प्रात्यक्षिक करून सांगितलं होतं. तो माझ्यासमोर बसून सगळं समजून सांगायचा. तो खूप चांगला होता.' त्याच्या जाण्यावर विश्वास बसत नाहीये, अशी भावना प्रशांत दामले यांनी व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atishi Oath Ceremony: ठरलं! अतिशी या दिवशी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; इतर नेतेही घेणार मंत्रि‍पदाची शपथ

IND vs BAN 1st Test Live : एक, दोन, तीन...! Virat Kohli पण गेल्याने भारतीय संघावर ओढावली नामुष्की; Hasan Mahmud ची भारी गोलंदाजी

Ziro Valley Tourism : भारतातल्या या ठिकाणाचं नावं आहे झिरो, जाणून घ्या का खास आहे हे शहर

Latest Marathi News Live Updates : वक्फ विधेयकावरील संयुक्त संसदीय समिती पाच राज्यांचा दौरा करणार

अनंत-राधिकाच्या लग्नात येण्यासाठी कलाकारांना पैसे दिले गेले? अनन्या पांडेने सांगितलं सत्य, म्हणते-

SCROLL FOR NEXT