मीना कुमारी ही बॉलीवूडमधील ती अभिनेत्री होती जिच्यासोबत काम करण्यासाठी अभिनेत्यापासून दिग्दर्शकापर्यंत सर्वजण निमित्त शोधत असत. त्याकाळी तिचे इतके चाहते होते की तिची एक झलक पाहण्यासाठी लोकांची गर्दी व्हायची. तिने चित्रपटांमधून खूप प्रसिद्धी मिळवली, पण तिचं वैयक्तिक जीवन वेदनांनी भरलेलं होतं. तिचं पतीसोबतचं नातं इतकं वाईट झालं की तिला दारूचं व्यसन लागलं आणि वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. मात्र एकदा खुद्द पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी मीना कुमारीची माफी मागितली होती. असं काय घडलेलं?
मीना कुमारीचे पती कमाल अमरोही यांनी 'पाकीजा'साठी धर्मेंद्र यांना कास्ट केलं होतं, परंतु मीना आणि धर्मेंद्र यांच्यातील जवळीक वाढत असल्याचं पाहून त्यांनी धर्मेंद्र यांना काढून टाकलं आणि राजकुमार यांना कास्ट केलं. चित्रपटाचे काही सीन्स आहेत ज्यात धर्मेंद्र लाँग शॉटमध्ये आहेत, मात्र राजकुमार क्लोज-अपमध्ये दिसत आहेत. ‘पाकीजा’चं शूटिंग सुरू झालं तेव्हा ब्लॅक अँड व्हाइट चित्रपटांचा जमाना होता, पण दुसऱ्यांदा शूटिंग सुरू झालं तोपर्यंत रंगीत चित्रपट बनायला सुरुवात झाली होती. अशा स्थितीत कमाल यांना पुन्हा शूटिंग करावं लागलं. अशातच त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या येऊन लागल्या. त्यामुळे शूटिंग थांबलं.
हा चित्रपट तयार होण्यासाठी 14 वर्षे लागली असल्याने मीनाही खूप बदलली होती. शेवटी तिची प्रकृती ढासळू लागली. दारूच्या व्यसनामुळे ती सेटवर बेशुद्ध झाली, त्यानंतर अनेक दृश्यांमध्ये मीनाच्या बॉडी डबलचा वापर करण्यात आला. त्यावेळी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना 'पाकिजा' चित्रपट पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मीना कुमारी यांनी त्यांना पुष्पहार घातला तेव्हा त्यांनी मीना यांना ओळखलंच नाही. मीना या १४ वर्षात खूप वेगळ्या दिसत होत्या.
नंतर मंचावर त्यांनी मीना कुमारीची याबद्दल माफीही मागितली आणि आपण मीना कुमारी यांना ओळखू शकलो नसल्याचं सांगितलं. इतकी प्रसिद्धी मिळवलेल्या या ट्रॅजिडी क्वीनचा अंत मात्र फार वाईट झाला. तिला दारूचं व्यसन लागलं त्यामुळे तिचा लिव्हर खराब झाला. त्यांच्यावर परदेशात उपचार करण्यात आले. मात्र ३१ मार्च १९७२ रोजी तिचं निधन झालं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.