Bollywood Update : ऐंशी-नव्वदच्या दशकात दिल्लीहून आलेल्या एका मुलाने कमी कालावधीतच त्याच्या अभिनयाने आणि चार्मने संपूर्ण देशाचं मन जिंकलं. हा अभिनेता आहे शाहरुख खान. बॉलिवूडचा बादशाह म्ह्णून ओळखला जाणारा शाहरुखच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय. परदेशातील मोठा सन्मान मिळणारा शाहरुख बॉलिवूडमधील एकमेव अभिनेता ठरला आहे.
आपल्या ३० वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत शाहरुख खानने सिनेजगताला अनेक उत्तम चित्रपट दिले आजवर अनेक परदेशी संस्थांनी त्याच्या कामगिरीसाठी सन्मान केला आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिस येथील ग्रेविन ग्लास म्युझियमने शाहरुखच्या सन्मानार्थ खास सोन्याचे नाणे जारी केले आहे. हे नाणं स्वतःच्या नावावर मिळवणारा शाहरुख एकमेव बॉलिवूड अभिनेता ठरला आहे. 2018 मध्ये, पॅरिसच्या प्रसिद्ध ग्रेविन संग्रहालयाने शाहरुखच्या सन्मानार्थ सोन्याचे नाणे जारी केले, ज्यामध्ये अभिनेत्याचे चित्र छापले आहे आणि त्याचे नाव देखील लिहिले आहे. शाहरुखच्या एका फॅन पेजने या नाण्याची झलक दाखवत हा विशेष सन्मान जाहीर केला.
या संग्रहालयात 2008 साली शाहरूखचा मेणाचा पुतळाही बसवण्यात आला होता. हे लक्षात घेण्यासारखे आहे की आतापर्यंत किंग खानचे 14 मेणाचे पुतळे जगाच्या विविध भागात बनवले गेले आहेत. शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो शेवटचा 'डंकी'मध्ये दिसला होता. गेले वर्ष त्याच्यासाठी खूप चांगले गेले. अभिनेत्याचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले आणि तिन्ही चित्रपटगृहात हिट ठरले. 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' या तिन्ही सिनेमांनी कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित केले. या चित्रपटांनी परदेशातही चांगला व्यवसाय केला. .
शाहरुख आगामी 'किंग' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमात त्याची मुलगी सुहाना खानही काम करतेय तर अभिनेता अभिषेक बच्चन या सिनेमात निगेटिव्ह भूमिकेत दिसणार असल्याचं म्हंटलं जातंय. पण याबाबत निश्चित माहिती मिळू शकली नाहीये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.