jui gadkari  esakal
Premier

असा नवरा हवा गं बाई! जुई गडकरी लग्नासाठी तयार; पण मुलासाठी आहेत दोन महत्वाच्या अटी, म्हणते- त्याने नेहमी...

Payal Naik

Jui Gadkari On Marriage: लोकप्रिय मराठी अभिनेत्री जुई गडकरी ही सध्या 'ठरलं तर मग' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. ही मालिका गेले वर्षभर टीआरपीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेने जणू प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. यातील जुई आणि अमित भानूशालीची जोडीही प्रेक्षकांना प्रचंड आवडते. मात्र जुई खऱ्या आयुष्यात अजूनही अविवाहित आहे. मात्र आता जुई लग्नबंधनात अडकण्यास सज्ज झाली आहे. तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिला कसा नवरा हवा याबद्दल सांगितलं आहे.

जुईने नुकतीच सुरेख तळवलकर यांच्या 'दिल के करीब' ला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना जुई म्हणाली, 'कर्जतमध्ये आमचा वाडा होता. आता त्याजागी बिल्डिंग असून तिथे आम्ही सगळेजण एकत्रित राहतो. मला खूप काका-काकी असून लहानपणापासून एकत्रित कुटुंबात राहण्याची सवय आहे त्यामुळे मला असंच स्वत:चं मोठं कुटुंब हवं आहे असे तिने सांगितले. मला हव्या असणाऱ्या या कुटुंबाबाबत विचार केला नाही. अर्थात मलाही माझं कुटुंब हवं आहे. माझ्या मैत्रिणींची मुले 10-10 वर्षांची झाली आहे. त्यामुळे मलाही आता विचार करावा लागणार आहे. देवाने माझ्यासाठी खूप चांगले मार्ग ठेवले आहेत. इतका उशीर होत आहे म्हणजे अर्थात सगळं चांगलंच असेल.'

आपल्याला कसा मुलगा हवा याबद्दल बोलताना ती म्हणाली, 'मला माझ्यासारखा साधा, सरळ, सोप्पा नवरा हवा आहे. पूर्णतः शाकाहारीही असावा. आणि कुटुंबात रमला पाहिजे असा असावा आणि मुख्य म्हणजे मी ज्या क्षेत्रात काम करत आहे त्या क्षेत्राला तो समजून घेणारा हवा.आमचं कुटुंब मोठं आहे त्यामुळे तो जेव्हा आमच्या कुटुंबाचा भाग होईल तेव्हा नक्कीच ते त्याचे लाड करतील. हे सर्व सांभाळून त्याने मला सांभाळावं एवढीच इच्छा आहे.' जुईने 'पुढचं पाऊल' या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता ती 'ठरलं तर मग' मध्ये सायलीच्या भूमिकेत दिसतेय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Economy : भारत २०३१ पर्यंत तिसरी अर्थव्यवस्था; ‘एस अँड पी’चा अहवाल

IND vs BAN 1st Test : मानलं अण्णा! R Ashwin च्या दमदार खेळीने भारताला सावरले, पण आज गणित गंडले, ऑल आऊट झाले

युद्धाच्या नव्या टप्प्याला सुरुवात,इस्राईलचा इशारा; लेबनॉनच्या सीमेवर सैन्याची जुळवाजुळव

१२ चौकार, ३ षटकार! Sanju Samson चे खणखणीत शतक; श्रेयस अय्यरच्या संघाला सावरले

Latest Marathi News Updates : राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवार यांच्या नेतृत्वात महत्वाची बैठक

SCROLL FOR NEXT