randeep bhangu  sakal
Premier

Actor Death: ती चूक महागात पडली! दारू समजून कीटकनाशक प्यायला; ३२ व्या वर्षी लोकप्रिय अभिनेत्याचा मृत्यू

Randeep Bhangu: दारू समजून कीटकनाशक प्यायल्याने लोकप्रिय अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे.

Payal Naik

Randeep Bhangu Death Reason: मरण आलं तर ते कुणीही टाळू शकत नाही. मृत्यू हा कोणत्याही रूपात येऊ शकतो. गेल्या वर्षभरात भारतीय सिनेसृष्टीने अनेक कलाकारांना गमावलं आहे. अशाच एका अभिनेत्याच्या मृत्यूने आता चाहत्यांना धक्का बसला आहे. अभिनेत्याची एक चूक त्याला चांगलीच महागात पडली आहे. या चुकीमुळे त्याने जीव गमावला आहे. लोकप्रिय अभिनेत्याने दारू समजून कीटकनाशकी प्यायल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. तो फक्त ३२ वर्षाचा होता. ही निधनाची बातमी ऐकून चाहत्यांना धक्का बसला आहे. रणदीप भंगू असं निधन झालेल्या अभिनेत्याचं नाव आहे.

रणदीप हा एक लोकप्रिय पंजाबी अभिनेता होता. त्याने अनेक पंजाबी चित्रपटात काम केलं होतं. त्याची पंजाबी सिनेसृष्टीत प्रचंड लोकप्रियता होती. मात्र त्याची चूक त्याच्या जीवावर बेतली. रानदीपने दारू समजून कीटकनाशक तोंडाला लावल्याने त्याचा मृत्यू झाला. अभिनेता रणदीप भंगूच्या मृत्यू प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अभिनेत्याला काही दिवसांपासून दारूचं व्यसन लागलं होतं. हे व्यसनाचा त्याच्या जीवाशी खेळ झाला.

अभिनेता आधीच नशेत होता. त्यात त्यानं शेतात मोटारीवर ठेवलेली किटकनाशकाची बाटली घेतली. ती बाटली दारूची आहे असं समजून त्यानं ती प्यायली. थोड्या वेळातच अभिनेत्याची तब्येत ढासळली. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र थोड्या वेळातच त्याचा मृत्यू झाला. पंजाबी कलाकारांनी त्याच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यांनी घेतला शहरी वृक्ष व्यवस्थापन कार्यशाळेत भाग

SCROLL FOR NEXT