Pushkar Jog esakal
Premier

Pushkar Jog: ॲक्शन सीन करताना पुष्कर जोगचा अपघात; गुडघ्याला आणि हाताला झाली दुखापत

priyanka kulkarni

Pushkar Jog: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) हा विविध चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. पुष्करच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. अशातच काही दिवसांपूर्वी पुष्कर जोगने त्याच्या 'धर्मा- दि एआय स्टोरी' या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा केली होती होती. पुष्कर हा सध्या या चित्रपटाचं शूटिंग करत आहे. अशातच पुष्करला या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दुखापत झाली आहे.

'धर्मा- दि एआय स्टोरी' या चित्रपटाचं शूटिंग स्कॅाटलँडमध्ये सुरु होते. या चित्रपटातील एक अॅक्शन सीन पुष्कर शूट करत होता. यावेळी त्याचा अपघात झाला. या अपघातात त्याच्या गुडघ्याला आणि हाताला जबर मार बसला आहे. याबाबत पुष्करनं एक पोस्ट देखील शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं होतं, "काल अॅक्शन सीक्वेन्सचं शूटिंग करताना माझ्या हाताला आणि गुडघ्याला दुखापत झाली आहे. खूप दुखतंय. तो कठीण दिवस होता"

Pushkar Jog

'धर्मा- दि एआय स्टोरी' हा चित्रपट आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित आहे. पुष्कर जोग आता मुंबईत दाखल झाला असून लवकरच तो चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.

'धर्म - द एआय स्टोरी' ची स्टार कास्ट

सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करुन पुष्करनं 'धर्मा- दि एआय स्टोरी' या चित्रपटाची घोषणा केली होती. त्यानं पोस्टमध्ये लिहिलं होतं,"Lights ... कॅमेरा... आणि AI च्या जंजाळात आपल्या मुलीच्या शोधात एका बापाचा प्रवास... धर्मा - The AI Story,लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला". धर्म - द एआय स्टोरी या चित्रपटामध्ये पुष्कर जोग, दिप्ती लेले आणि स्मिता गोंदकर यांसारखे कलाकार दिसणार आहेत.

‘जबरदस्त’ या चित्रपटातून पुष्करनं अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. पुष्करनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे, तसेच त्यानं मराठी बिग बॉस या शोमध्ये देखील सहभाग घेतला. पुष्करचा बापमाणूस हा चित्रपट गेल्या वर्षी रिलीज झाला. आता पुष्करच्या धर्म - द एआय स्टोरी या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसर, कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती या जागांवर मनसे उमेदवार देणार

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT