Pushkar Jog Esakal
Premier

Marathi New Film : मुसाफिरा सिनेमानंतर पुष्कर जोग घेऊन येतोय 'टॅबू' ; पार पडला सिनेमाचा मुहूर्त

सकाळ डिजिटल टीम

Pushkar Jog New Movie : अभिनेता पुष्कर जोग सध्या त्याच्या वेगवेगळ्या सिनेमांमुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याचा मुसाफिरा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला तर त्याच्या व्हिक्टोरिया या सिनेमाने सगळ्यांची मनं जिंकली आणि आता पुष्कर नव्या सिनेमाची निर्मिती करतोय. नुकताच या सिनेमाचा मुहूर्त थाटात पार पडला.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पुष्करने त्याच्या या आगामी सिनेमाची बातमी सगळ्यांबरोबर शेअर केली. फिल्म क्लॅपबरोबर त्याने फोटो शेअर केला असून त्यामागे त्याच्या वडिलांचाही फोटो दिसतोय. त्याने फोटोंना "आज माझ्या ३१ व्या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करतोय. हे असंच सुरु राहुदेत. या फिल्मचा विषय खूप महत्त्वाचा आहे." असं कॅप्शन त्याने दिलंय. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्याचं अभिनंदन केलं.

आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने, गुझबम्प्स एंटरटेनमेंट प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर स्वतः करणार असून योगेश महादेव कोळी या सिनेमाचे डीओपी आहेत. 'टॅबू'ची खासियत म्हणजे ॲमस्टरडॅम आणि पॅरिसमध्ये चित्रित होणार हा पहिला मराठी चित्रपट असणार आहे. दरम्यान, या चित्रपटात कोणते चेहरे झळकणार हे जाणून घेण्यासाठी थोडी पाहावी लागेल.

टॅबू या सिनेमाविषयी सांगताना पुष्कर म्हणाला कि,"एक कलाकार म्हणून माझ्याकडून जे सर्वोत्कृष्ट देता येईल, ते देण्याचा मी नेहमीच प्रयत्न करतो. रिऍलिस्टिक चित्रपट हे प्रेक्षकांना जास्त जवळचे वाटतात. त्यामुळे मी नेहमीच नातेसंबंधांवर चित्रपट बनवतो. त्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो. काही नवनवीन देण्याचा माझा कायमच प्रयोग करतो. 'टॅबू'च्या माध्यमातूनही मी काहीतरी नवीन घेऊन येत आहे. नुकतीच चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. लवकरच चित्रपटही भेटीला येईल."

'कोक' या आगामी बॉलिवूड चित्रपटात पुष्कर लीड रोलमध्ये झळकणार असून लवकरच त्याचा ' 'धर्मा- दि एआय स्टोरी' हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित हा पहिलाच मराठी चित्रपट असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT