bigg boss marathi 5 esakal
Premier

अब मजा आयेगा ना भिडू! निक्की तांबोळीची बँड वाजवायला घरात आली राखी सावंत; नेटकरी म्हणाले- चला आता...

Payal Naik

मराठी प्रेक्षकांसोबतच हिंदी प्रेक्षकांकडूनही आवर्जून पाहिला जाणारा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे 'बिग बॉस मराठी ५'. या सीझनमध्ये मेकर्सकडून खूप बदल करण्यात आले. त्यामुळेच की काय हा सीझन सुपरहिट ठरला. यापूर्वी कधीही बिग बॉस मराठीला इतका टीआरपी आला नव्हता. घरात होणारे राडे, घरातील व्यक्ती हे या सगळ्याला कारणीभूत ठरले. आता या कार्यक्रमाचे शेवटचे काही दिवस उरले आहेत. त्यात आता मेकर्सनी कार्यक्रमात आणखी एक ट्वीस्ट आणायचं ठरवलं आहे. आता कार्यक्रमात ड्रामा क्वीन राखी सावंतची एंट्री होणार आहे. आल्या आल्या राखीने निक्कीवर निशाणा साधला आहे. तिला पाहूनच निक्कीच्या चेहऱ्याचा रंग बदललेला दिसतोय. .

कलर्स मराठीने एक नवा प्रोमो शेअर केला आहे ज्यात राखी घरात येताना दिस्ततेय. ती घरात येताच म्हणते हॅलो बिग बॉस मी परत आलीये. तुमची पहिली बायको. तिला पाहताच निक्की चिंतेत पडते आणि म्हणते, हाय रब्बा. त्यानंतर राखी निक्कीकडे येते आणि म्हणते, निक्की, सस्ती राखी सावंत. आता घरात चालणार आहे माझा ठणाणणा.... निक्की तांबोळी, सोडून येणार तुला आंबोली.' त्यावर घरातले सगळे हसताना दिसत आहेत. तर राखी अभिजीतच्या अंगावर पडताना दिसतेय. निक्की आणि राखी यांची ही लढाई 'बिग बॉस १४' पासून आहे. त्यांचं 'बिग बॉस १४च्या घरातही खूप भांडण व्हायचं आणि तिथेही राखी निक्कीवर भारी पडायची. हा प्रोमो पाहून नेटकरीही आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

एका नेटकऱ्याने लिहिलं, 'चला शेवट तरी गोड होतोय. शेवटी शेवटी राखीला आणल्यावर राख तरी होणार नाही टीआरपीची.' आणखी एकाने लिहिलं, 'राखीशिवाय बिग बॉस पूर्णच नाही होऊ शकत.' दुसऱ्याने लिहिलं, 'राखीला थोडं आधी पाठवायला पाहिजे होत घरात.. अजून मज्जा आली असती.' आणखी एकाने लिहिलं, 'या वेळी बिगबॉस ने प्रेक्षकांच्या सगळ्याचं इच्छा पूर्ण केल्यात.' आता हा भाग पाहण्यासाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: खुशखबर! 'लाडकी बहीण'चा तिसरा हप्ता जमा होण्यास झाली सुरूवात; पैसे आले की नाही 'असे' करा चेक

Tata Factory Fire: टाटा समूहाच्या आयफोन प्लांटला भीषण आग; 100हून अधिक पोलिस तैनात, पाहा- VIDEO

IND vs BAN, 2nd Test: दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द! पावसाने खेळाडूंना मैदानात उतरूच दिलं नाही

Dharmveer Movie: ‘धर्मवीर ३’चे स्क्रीप्ट मी लिहिणार ! फडणवीस यांनी का केला मोठा दावा?

Latest Maharashtra News Live Updates : हिजबुल्लाह नेता हसन नसराल्लाह ठार? IDF ची सोशल मीडियावर पोस्ट

SCROLL FOR NEXT