Ranbir Kapoor Esakal
Premier

Ranbir Kapoor & Rishi Kapoor : "त्यांच्या निधनानंतर मी रडलो नाही" ; वडिलांच्या मृत्यूवर रणबीर झाला व्यक्त , डॉक्टर म्हणाले...

Ranbir Kapoor shared his grief after loosing father : अभिनेता रणबीर कपूर पहिल्यांदाच त्याचे वडील ऋषी कपूर यांच्या निधनाबाबत व्यक्त झाला. ऋषी कपूर यांच्या निधनाच्या आदल्या रात्री काय घडलं जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Ranbir Kapoor about Rishi Kapoor : अभिनेता रणबीर कपूर सध्या बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याच्या अभिनयाची अनेकांनी तारीफ केली आहे. प्रत्येक सिनेमातील त्याचा कस लावणारा अभिनय सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो. नुकतंच रणबीरने दिलेल्या मुलाखतीमध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर त्याच्यावर काय परिणाम झाला ही गोष्ट शेअर केली.

रणबीरने नुकतीच निखिल कामथच्या पीपल टीव्ही युट्युब चॅनेलवरील पॉडकास्ट शोमध्ये हजेरी लावली. यावेळी त्याने पहिल्यांदाच त्याचे वडील आणि दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांच्याशी त्याचं असलेलं नातं, त्यांच्या मृत्यूचा त्याच्यावर झालेला परिणाम आणि ज्यादिवशी ही घटना घडली तो दिवस यावर भाष्य केलं.

रणबीर म्हणाला कि,"तुला ही ऐकायला थोडी गंमत वाटेल पण माझ्या वडिलांचं निधन झालं तेव्हा मी रडलो नाही. मी अजूनही त्याबद्दल व्यक्त झालो नाही आहे किंवा मला अजूनही शोक नेमका कसा व्यक्त करायचा हे समजलं नव्हतं. त्यांचं निधन झालं त्याच्या बरोबर आदल्या रात्री डॉक्टरांनी मला याबद्दल सांगितलं होतं. ‘त्यांची ही शेवटची रात्र आहे…त्यांचं कधीही निधन होऊ शकतं’ डॉक्टरांचे ते शब्द ऐकून मला काहीच सुचत नव्हतं. मला आठवतंय मी एका खोलीत गेलो होतो. मला पॅनिक अटॅक आला होता. नेमकं मला आपलं दु:ख कसं व्यक्त करायचं हे माहीत नव्हतं. त्यानंतर मग आयुष्यात माझं किती मोठं नुकसान झालंय याची जाणीव मला झाली"

वडिलांबरोबरच्या बॉण्डिंगविषयी रणबीर म्हणाला कि,"आमचं बॉण्डिंग कधीच चांगलं नव्हतं, आम्हाला एकमेकांविषयी प्रेम होत पण आम्ही कधीच व्यक्त केलं नाही. माझ्या वडिलांनी उपचारावेळी बराच काळ न्यूयॉर्कमध्ये घालवला. त्यावेळी आम्ही पूर्ण कुटूंब एकत्र होतो. मी त्यांच्याबरोबर ४५ दिवस राहिलो होती. त्यावेळी एके दिवशी ते माझ्या खोलीत आले आणि रडू लागले. या आधी ते कधीच असं वागले नव्हते. त्यामुळे मला त्यांच्याशी कस वागावं हे कधीच कळलं नाही. त्यांना मिठी मारावी की नाही हे सुद्धा मला माहिती नव्हतं. त्यावेळी आमच्यात किती अंतर आहे याची मला जाणीव झाली. त्यादिवशी मला खूप जास्त अपराधी वाटलं कारण आमच्यातील अंतर मी कमी करू शकलो नाही. "

३० एप्रिल २०२० ला ऋषी कपूर यांचं कॅन्सरमुळे निधन झालं. गेला बराच काळ त्यांच्यावर उपचार सुरु होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT