Sakal Premier Awards 2024 : तरुण अभिनेत्री राशी खन्ना हिला ‘पॉप्युलर फेस ऑफ द इयर’ हा पुरस्कार जाहीर झाला. तिने आपल्याला मराठी ऐकायला खूप मस्त वाटते. मराठी बोलता येत नाही; पण मराठी समजते, असे सुरुवातीलाच सांगितले. मराठी भाषा शिकण्यासाठी मराठी चित्रपट पाहणे सुरू केले आहे. माझी यापुढची वाटचाल मोठी आहे.
या पुरस्कारांमुळे पुढे जायचा आत्मविश्वास वाढतो, अशा शब्दांत तिने कृतज्ञता व्यक्त केली. संधी आली तर मी मराठीतही काम करेन, असेही ती म्हणाली. ‘मास्तर, नाय तुमच्या हातात तुणतुण दिलं, तर नाव नाही सांगणार’ हा पिंजरा चित्रपटातील संवादही तिने आत्मविश्वासाने बोलून दाखवला.
अदा शर्मा हिला ‘परफॉर्मर ऑफ द इयर’ हा पुरस्कार देण्यात आला. मी जन्माने महाराष्ट्रीयन असल्याचे ती म्हणाली. शाळेत मला फ्रेंच व मराठी असे दोन पर्याय होते. मात्र, महाराष्ट्रात राहत असल्याने मराठी भाषा शिक, असा आग्रह वडिलांनी धरल्याने मी मराठी शिकले, अशी आठवणही तिने सांगितली.
मराठी शिकल्याने मला मराठी चांगली येते, बोलताही येते. मी मराठीत कविताही करते. ही भाषा मला खूप आवडते, असे सांगताना तिने इडलीची कविताही केली. ‘इडली चिडली, सांबारात बुडली’ ही कविता म्हणून दाखवली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.