"पुरुषावर विश्वास ठेवण्यासारखी दुसरी भयानक गोष्ट नाही";'अॅनिमल'बाबत नेटकऱ्याची पोस्ट; रश्मिका म्हणाली,"मूर्ख पुरुषावर..."
Animal sakal
Premier

Animal: "पुरुषावर विश्वास ठेवण्यासारखी दुसरी भयानक गोष्ट नाही"; 'अॅनिमल'बाबत नेटकऱ्याची पोस्ट; रश्मिका म्हणाली,"मूर्ख पुरुषावर..."

priyanka kulkarni

Animal: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि बॉबी देओल (Bobby Deol) यांचा 'ॲनिमल' (Animal) हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली असली तरी अनेकांनी या चित्रपटावर टीका केली आहे. या चित्रपटातील रणबीरच्या भूमिकेला अनेकांनी ट्रोल केलं. अशातच आता एका नेटकऱ्यानं अॅनिमल या चित्रपटाबाबत एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटला रश्मिकानं रिप्लाय दिला आहे. रश्मिकाच्या या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

नेटकऱ्याचे ट्वीट

एका नेटकऱ्यानं अॅनिमल या चित्रपटातील काही सिन्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओला त्यानं कॅप्शन दिलं, "पुरुषावर विश्वास ठेवण्यासारखी दुसरी भयानक गोष्ट नाही" या ट्वीटला रश्मिकानं रिप्लाय दिला आहे.

रश्मिकाचा रिप्लाय

नेटकऱ्याच्या ट्वीटला रश्मिकानं रिप्लाय दिला, "करेक्शन, मूर्ख पुरुषावर विश्वास ठेवणे धोकादायक आहे. इतर अनेक चांगले लोक देखील आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवा, त्या लोकांवर विश्वास ठेवणे स्पेशल आहे."

रश्मिकानं अॅनिमल या चित्रपटात गितांजली ही भूमिका साकारली आहे. तर रणबीरनं या चित्रपटात रणविजय सिंग ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केलं आहे. या चित्रपटात तृप्ती डिमरी, अनिल कपूर यांनी देखील महत्वाची भूमिका साकारली आहे.

रश्मिकाचे आगामी चित्रपट

'The Girlfriend’, ‘D-51’ and highly anticipated, ‘Pushpa 2- The rule’ या चित्रपटांमधून लवकरच रश्मिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रश्मिकाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumabi Traffic Ambani Wedding : मुंबईत अंबानींचा हायप्रोफाईल लग्नसोहळा, वाहतुकीत महत्वाचे बदल; 'या' मार्गावर जाणं टाळा

T20 World Cup: 'तोही रडत होता अन् मीही, तेव्हा...', रोहितबरोबरच्या 'त्या' खास क्षणाबद्दल विराट झाला व्यक्त

Bajaj Freedom 125: बजाजने लॉन्च केली जगातील पहिली CNG बाईक! बजाज फ्रीडम 125 भारतात लॉन्च, किती आहे किंमत?

Snake Bite to Youth: सापानं चावा घेतल्यानंतर त्यानंही घेतला चावा! सापाचा झाला मृत्यू पण तरुणाचं काय झालं?

Mahesh Jethmalani: अदानीला संपवण्यासाठी चीन प्रयत्न करतोय का? महेश जेठमलानींचे धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT