ratan tata esakal
Premier

देव चोरला माझा...! रतन टाटा यांच्या निधनाने सिनेसृष्टी हळहळली; मराठी कलाकारांनीही पोस्ट करत वाहिली श्रद्धांजली

Payal Naik

लोकप्रिय बिझनेसमॅन रतन टाटा यांनी काळ ९ ऑक्टोबर २०२४ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देश दुःखात बुडाला आहे. त्यांच्यासाठी देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. अशातच बॉलिवूड कलाकार आणि मराठी सिनेसृष्टीतूनही त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येतेय. स्वतःचा फायदा न पाहता मोठ्या मनाने सगळयांना मदत करताना एक सच्च्या दिलाच माणूस हरपला म्हणून कलाकारांनीही शोक व्यक्त केला आहे.

रतन टाटा यांच्या निधनावर कुशल बद्रिके याने पोस्ट करत लिहिलं, 'एखाद्याला निरोप देताना आपण सहज ‘टा-टा’ म्हणतो, पण ‘रतन टाटा’ सर, तुम्हाला सहज निरोप देता येत नाहीये. तुम्ही देशाला नुसतं फोनने नाहीतर, माणुसकीने जोडलंत, माणसांमधल्या कॅन्सरच्या तारा कापून, इलेक्ट्रिकच्या तारांनी देश जगवलात. तुम्ही बनवलेल्या गाड्या जर भारतातल्या रस्त्यावरून धाऊ शकतात, तर त्यातून आम्ही चंद्रावर सुद्धा सहज प्रवास करू अशी मला खात्री वाटते. भारताला सुजलाम सुफलाम म्हणतात ते तुमच्या सारख्या महान व्यक्तींमुळेच. ‘रतन टाटा’ सर तसा आपला वैयक्तिक असा कधी संबंध आला नाही. लेकीन, मैने आपका नमक खाया है! आणि संबंधाचं म्हणाल तर ‘देवा’बरोबर ही माझा वैयक्तिक असा कधी संबंध आला नाही, पण त्याचे अनंत उपकार कधीच विसरता येणार नाहीत आणि तुमचे सुद्धा…'

अभिनेता संतोष जुवेकर याने याने पोस्ट करत लिहिलं, 'देवानं देव चोरला माझा. माणसातला देव माणूस गेला. आज देवानं त्याचा देव्हारा मांडलाय, आज स्वर्गात आहे घटस्थापना.' लेखक क्षितीज पटवर्धन पोस्ट शेअर करत लिहितो, “रतन टाटा सर… ज्यांनी फक्त कंपनी नाही, तर संस्कृती उभी केली. फक्त मालाची विक्री नाही, मूल्यांची बांधणी केली. पिढ्यांना रोजगारच नाही, तर अगणित स्वप्न दिली. फक्त कंपनीला नाव नाही, तर देशाला कीर्ती दिली. तुमच्या वैचारिक श्रीमंतीला आणि भौतिक साधेपणाला, तेजःपुंज व्यक्तिमत्वाला, आणि लखलखीत कारकिर्दीला… विनम्र अभिवादन”

ratan tata death

अभिनेता प्रसाद ओक, सलील कुलकर्णी, सुकन्या मोने, प्रसाद खांडेकर, रितेश देशमुख यांनीही पोस्ट करत हळहळ व्यक्त केली आहे. तर बॉलिवूड कलाकारांनीही पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: मंत्रीमंडळ बैठकीतून बाहेर पडण्यामागं नाराजीचं कारण होतं का? अजित पवारांनी अखेर स्पष्टच सांगितलं

Latest Marathi News Updates: भांडूपमध्ये शिवसेना उमेदवार देणार नाही

IND vs AUS : आपला Rohit Sharma नाही, तर त्यांचा...! ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, स्टार खेळाडू Border-Gavaskar Trophy ला मुकणार

Donate Hair For Cancer Patients: कॅन्सरग्रस्त महिलांनाही सुंदर दिसण्याचा सुकेशिणी होण्याचा अधिकार, साम वृत्तनिवेदिकेने केले केशदान

बापावरून बोललेलं मी नाही ऐकणार... अपूर्वाने सांगितलं 'रात्रीस खेळ चाले' मालिका सोडण्याचं कारण, म्हणाली- तुमचे निर्माते जेव्हा

SCROLL FOR NEXT