Zoheb Hasan with Ratan Tata during the launch of the "Young Tarang" album at The Taj Hotel in Mumbai. esakal
Premier

हॅलो मी रतन बोलतोय... टाटांनी बनवली होती स्वतःची म्युजिक कंपनी, पाकिस्तानी गायकाने शेअर केल्या आठवणी

Sandip Kapde

गायक जोहेब हसन यांनी नुकत्याच त्यांच्या इंस्टाग्रामवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या सोबतच्या आठवणी शेअर करून त्यांच्या चाहत्यांना भावूक केले आहे. हसन यांनी टाटांच्या साधेपणाबद्दल, त्यांच्या नम्रतेबद्दल आणि म्युझिक इंडस्ट्रीमध्ये टाटांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल खास आठवणी जागवल्या आहेत.

सुरुवातीची आठवण: फोनवरचा आवाज

जोहेब हसन यांनी लिहिलं आहे की त्यांच्या बहिणी नाझियाला एके दिवशी फोन आला होता. त्यांच्या आईने सांगितलं, "नाझिया आणि जोहेब, तुम्हाला एक कॉल आलाय, एका सज्जन माणसाने नाव सांगितलंय ‘रतन’." हा फोन कोणी दुसरा नसून, रतन टाटा यांचाच होता. "माझं नाव रतन आहे, आणि मी CBS India नावाचं म्युझिक कंपनी सुरू करत आहे. मला तुमच्याकडून एक अल्बम तयार करायचं आहे," असा टाटांचा प्रस्ताव होता.

साधेपणाचा परिचय-

हसन यांनी सांगितलं की रतन टाटा यांनी त्यांच्याकडे येऊन त्यांची भेट घेतली. "शुक्रवारी एक उंच, सूट घातलेला व्यक्ती आमच्या घरी आला. त्यांच्या चेहऱ्यावर मृदू स्मित होतं आणि ते अतिशय नम्रपणे बोलले. त्यांनी कधीही आपल्या प्रतिष्ठेबद्दल गर्व केला नाही." त्यांनी पुढे सांगितलं की रतन टाटा यांच्या साधेपणाने त्यांना खूप प्रभावित केलं. हसन यांना माहितही नव्हतं की हे कोण आहेत, परंतु त्यांनी अल्बमची चर्चा केली आणि स्पष्टपणे सांगितलं की कराराच्या प्रत्येक बाबतीत योग्य सल्ला घ्या.

#YoungTarang अल्बमचा यशस्वी प्रवास

जोहेब हसन आणि नाझिया यांनी नंतर CBS India सोबत "Young Tarang" अल्बम तयार केला. हा अल्बम भारत आणि दक्षिण आशियातील पहिल्या म्युझिक व्हिडिओंपैकी एक होता. एमटीव्हीने देखील या व्हिडिओंना खूप प्रशंसा दिली होती. हसन यांच्या म्हणण्यानुसार, दूरदर्शनने देखील या व्हिडिओंना भारतात प्रसारित केलं आणि हा अल्बम खूपच प्रसिद्ध झाला. या अल्बमने "Disco Deewane"लाही विक्रीत मागे टाकलं.

रतन टाटा यांचं साधं जीवन-

अल्बमच्या लॉन्चनंतर, रतन टाटा यांनी जोहेब हसन आणि त्यांच्या बहिणीला त्यांच्या घरी जेवायला बोलावलं. हसन यांना वाटत होतं की रतन टाटा एक मोठ्या महालात राहत असतील, परंतु जेव्हा ते त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना धक्का बसला. "टाटांची राहण्याची जागा साधी दोन खोल्यांची होती, आणि घरामध्ये अगदी कमी सजावट होती." त्यांच्या साधेपणाने हसन यांच्या मनात टाटांचा अधिकच आदर वाढला.

खरा सज्जन आणि उद्योगजगताचा दिग्गज-

जोहेब हसन यांच्या या पोस्टमधून रतन टाटा यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळाच पैलू उलगडला. त्यांनी रतन टाटांच्या नम्रतेचं आणि माणुसकीचं कौतुक केलं. हसन यांच्या शब्दांत, "तो दिवस आणि ती साधी परंतु अविस्मरणीय भेट मी कधीही विसरणार नाही. ते एक खरे सज्जन होते आणि उद्योगजगतातील एक महान व्यक्ती." जोहेब हसन यांच्या या पोस्टने चाहत्यांमध्ये भावूकता निर्माण केली असून रतन टाटा यांच्याबद्दलचं प्रेम आणि आदर अजूनही कायम आहे.

Bopdev Ghat: आणखी किती पळणार... बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील नराधमांना अखेर पोलिसांनी शोधलं

सूरजला सिनेमात घेतलं म्हणून ट्रोल करणाऱ्या कलाकारांना केदार शिंदेंनी सुनावलं, म्हणाले- तुम्ही कधीही...

दलित कुटुंबासोबत राहुल गांधींनी घेतला जेवणाचा आस्वाद; 'त्या' जेवणाचे घेतले नमुने, महत्त्वाची माहिती आली समोर

Dussehra 2024: यंदा 12 की 13 ऑक्टोबर कधी साजरा केला जाणार दसरा? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् वेळ

Gunratna Sadavarte: सदावर्तेंच्या गाढवामुळे सलमान आला अडचणीत! बिग बॉसला आली कायदेशीर नोटीस, काय हा प्रकार ?

SCROLL FOR NEXT