Premier

मोहन जोशींना झाला होता मालिका सोडल्याचा पश्चाताप; जाणून घ्या शूटिंगदरम्यानचा 'तो' भन्नाट किस्सा...

सकाळ डिजिटल टीम

Eka Lagnachi Dusri Goshta Latest News : झी मराठीवरील 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' ही मालिका आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. आपल्या करिअर्स आणि जबाबदाऱ्यांमुळे लग्न टाळणाऱ्या एका जोडप्याची हटके लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांनी या मालिकेत राधा आणि घना ही भूमिका साकारली होती. नुकतंच या मालिकेच्या टीमने एका मुलाखतीत मोहन जोशी यांचा मजेदार किस्सा शेअर केला.

'एका लग्नाची दुसरी गोष्ट' या मालिकेत अनेक कलाकार होते आणि घना-राधाचं लग्न, त्यांचा संसार यावर ही मालिका बेतली होती. मालिकेत त्यांचं लग्न जमल्याचं दाखवूनही काही ना काही कारणामुळे त्यांच्या लग्नाचा एपिसोड खूप रखडत होता आणि त्यावेळी काय गंमत घडली याचा किस्सा अभिनेता आणि या मालिकेचा लेखक चिन्मय मांडलेकरने 'द क्राफ्ट' या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितला.

तो म्हणाला,"या मालिकेत राधा-घनाचं लग्न खूप काळ रखडलं होतं आणि प्रेक्षकांकडून चॅनेलवरही त्यांचं लग्न दाखवावं म्हणून दबाव टाकण्यात येत होता. अखेर चॅनेल, निर्माते आणि आम्ही लेखक अशी मिळून एक मिटिंग झाली. या मिटिंगमध्ये खूप मोठ्या मोठ्या कल्पना चॅनेलच्या टीमकडून सुचवण्यात आल्या पण मालिकेचे निर्माते श्रीरंग गोडबोले शांत होते. सगळी चर्चा सुरु असताना ते मध्येच म्हणाले,'सगळं ठीक आहे पण मोहन जोशी लग्नाच्या एपिसोड्ससाठी उपलब्ध नाहीयेत. त्यांचा फोनही ते उचलत नाहीयेत.' हे ऐकल्यावर सगळ्यांना धक्का बसला त्यातच श्रीरंग सर मला म्हणाले तू फोन कर. मी फोन लावला आणि मोहन जोशींनी उचलला. त्यांना मी लग्नाविषयी सांगितलं तर सुरुवातीला त्यांचा माझं लग्न आहे असा गैरसमज झाला पण मी त्यांना घना-राधाच्या लग्नाविषयी सांगितलं तेव्हा ते म्हणाले कि,'माझ्यासाठी थांबू नका. मी गोरखपूरमध्ये शूट करतोय. तुम्ही लग्न लावून टाका.' आता काय करायचं हा प्रश्न आम्हाला पडला. मग आम्ही लग्नाची थीमच ठरवली बाबा कुठेयत? म्हणजे सगळेचजण त्यांना शोधत आहेत. ते प्रत्येकाला भेटत आहेत, कामात बिझी आहेत पण फ्रेम मध्ये दिसत नाहीयेत. त्यामुळे सगळ्यांचा असा समज झाला कि मोहन जोशी लग्नाला उपस्थित आहेत. शेवटी मुश्किलीने त्यांची एकच डेट आम्हाला मिळाली. त्यात त्यांचा एक शॉट आम्ही घेतला ज्यात ते सगळं आटपल्यावर मांडवातच झोपले आहेत. त्यानंतर त्यांनी ती मालिका सोडली आणि विवेक लागूंनी ही भूमिका साकारली."

ही मालिका सोडल्यानंतर मोहन यांना खूप पश्चाताप झाल्याचं त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये शेअर केलंय. चिन्मय आणि स्वप्नीलनेही या मुलाखतीमध्ये हे गोष्ट शेअर केली. मोहन यांची आई आणि कुटूंबानेही त्यांनी ही मालिका सोडू नये म्हणून त्यांना समजावलं होतं. तसंच ज्या सिनेमासाठी त्यांनी ही मालिका सोडली त्या सिनेमातही त्यांना मनासारखं काम मिळालं नाही अशी गोष्ट त्यांनी पुढे मालिकेच्या टीमसोबत शेअर केली.

१६ जानेवारी २०१२ ला सुरु झालेल्या या मालिकेने १९२ एपिसोड्स पूर्ण करत २५ ऑगस्ट २०१२ला प्रेक्षकांचा निरोप घेतला. यानंतर अँड टीव्ही या चॅनेलवर 'चुपके चुपके' या नावाने या मालिकेचा हिंदी रिमेकही करण्यात आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT