Saba Azad  Esakal
Premier

Viral Post : हृतिकला डेट करत असल्यामुळे अभिनेत्रीचं करिअर उध्वस्त ; सोशल मीडियावर व्यक्त केला संताप

सकाळ डिजिटल टीम

Saba Azad & Hrithik Roshan : अभिनेता हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद सोशल मीडियावर काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. बऱ्याच गोष्टींवर ती अनेकदा परखडपणे व्यक्त होतानाही दिसते. नुकतंच तिने शेअर केलेल्या पोस्टमुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ती हृतिक रोशनला डेट करत असल्यामुळे अनेक कामं तिच्या हातून निघून गेल्याच तिने या पोस्टमध्ये म्हंटलं.

सबाची पोस्ट

सबाने नुकतीच इंस्टाग्रामवर काही स्टोरीज शेअर केल्या आणि या स्टोरीजमध्ये तिच्याबाबतीत इंडस्ट्रीत घडलेला प्रकार सांगितला. ती म्हणाली,"तर बऱ्याच जणांना माहित आहे आणि काही जणांना माहितही नसेल पण गेला दशकभराहून जास्त काळ व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम करतेय आणि अनेक अड फिल्म्सना मी आवाज दिलाय पण एके दिवशी अचानक माझ्या लक्षात आलं कि जवळपास एक महिना मी कोणत्याच प्रोजेक्टला आवाज दिला नाहीये. नंतर हे महिने वर्षात इतके लगेच बदलले आणि त्यातही मी काहीच मनासारखं काम केलं नाही. मी कुणालाच मी हे क्षेत्र सोडतेय किंवा मला आता यात इंटरेस्ट उरला नाहीये असं सांगितलं नव्हतं. किंवा मी माझी फी सुद्धा वाढवली नव्हती. माझ्याकडूनही कोणताही बदल झाला नसताना नेमकं काय घडलं या बाबत मी गेल्या महिन्यापर्यंत पूर्णपणे अनभिज्ञ होते. "

ती पुढे म्हणाली, "पण जेव्हा एका दिग्दर्शकाला भेटले ज्याच्याबरोबर मी सतत काम करायचे तेव्हा मला या गोष्टीचा उलगडा झाला. मी त्याला सरळ विचारलं कि, मला जाणून घ्यायचंय कि तुम्ही आता माझ्याकडे व्हॉइस ओव्हरचे प्रोजेक्ट्स का घेऊन येत नाही आणि त्याने जे उत्तर दिलं ते ऐकून मला धक्का बसला.

तो म्हणाला कि, आम्हाला वाटलं कि तुला आता असं काही करावंसं वाटणार नाही म्हणजे व्हॉइस ओव्हर देणं वगैरे आणि तुझ्या लक्षात आलंच असेल कशामुळे. बघा मला हे मान्य करावंच लागेल ही जी व्यक्ती आहे ती खूप उत्तम काम करते. या क्षेत्रातील तो एक उत्तम दिग्दर्शक आहे आणि खूप आधुनिक विचारांचा आणि छान माणूस आहे. त्यामुळे तो असा विचार करत असावा असं कधीच माझ्या डोक्यात आलं नाही. थोडक्यात त्याला हे म्हणायचं होतं कि, आता मी ज्या व्यक्तीला डेट करतेय त्याच्यामुळे मला असं काम करायची इच्छा नसेल. "

"तर आता इथे एक असा माणूस मला भेटला जो आधुनिक आहे आणि उत्तम आहे पण तरीही त्याने असा विचार केला कि मी फक्त कुणालातरी डेट करत असल्यामुळे इतकं उत्तम आणि चांगले पैसे मिळवून देणारं काम नाकारेन. जर तो असा विचार करत असेल तर विचार करा इतर जग काय म्हणत असेल.

जेव्हा कधीही दोन स्वतंत्र व्यक्ती एकमेकांबरोबर रिलेशनशिपमध्ये येतात तेव्हा ते त्यांची ओळख, त्यांचं इतर आयुष्य आणि करिअर सोडत नाहीत. ते त्यांची वैयक्तिक ओळख, त्यांचा स्वातंत्र्य आणि त्यांची शक्ती जपतात. मी अजूनही स्वतःसाठी कमावते. काही लोकांच्या फक्त अंदाजामुळे मी माझं संपूर्ण करिअर उध्वस्त नाही करू शकत. प्लिज अजूनही मी काम करतेय हे लक्षात ठेवा.

आपण अजूनही त्या काळात राहतो का जजेव्हा विचार केला जायचा कि बाईने एका श्रीमंत माणसाशी लग्न केलं कि तिला स्वतःसाठी कमावण्याची गरज नाही. किंवा तिच्या कुटूंबाची काळजी ती स्वतःच्या पैशाने घेऊ शकत नाही. हे किती दुसऱ्याबद्दलचे वाईट अंदाज आहेत. तर मी जवळपास माझं संपूर्ण करिअर गमावलं होतं कारण लोकं विचार करत होते कि, आता मला कामाची गरज नाहीये म्हणून. ही पूर्णपणे पुरुषसत्ताक आणि प्रतिगामी विचारसरणी आहे. " अशी पोस्ट तिने शेअर केली.

सबाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून अनेकांनी कमेंट्स करत तिला सपोर्ट केला. सोशल मीडियावर यामुळे अभिनेत्रींना लग्न झाल्यानंतर किंवा डेटिंगच्या बातम्यानंतर इंडस्ट्रीत देण्यात येणारी वागणूक या निमित्ताने समोर आलीये असं म्हणायला हरकत नाही.

गेली दोन वर्षं सबा आणि हृतिक एकमेकांना डेट करत आहेत. त्या दोघांमध्ये 12 वर्षांचं अंतर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT