Sachin and Supriya Esakal
Premier

Sachin & Supriya Pilgaonkar : 'नवरी मिळाली नवऱ्याला'च्या सेटवर जमली जोडी , सचिन-सुप्रियाची भन्नाट लव्हस्टोरी

सकाळ डिजिटल टीम

Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील एक एव्हरग्रीन जोडी म्हणजे सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर. नवरी मिळे नवऱ्याला या सिनेमामुळे पहिल्यांदा एकत्र आलेली ही जोडी नंतर आयुष्यभरासाठी लग्नबंधनात अडकली. या जोडीची लव्हस्टोरी कशी सुरु झाली जाणून घेऊया.

सचिन पिळगांवकर हे मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीतील आघाडीचं नाव. बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत आलेल्या सचिन यांनी तरुणपणातही अनेक भूमिका गाजवल्या. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शक म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख मराठी इंडस्ट्रीमध्ये निर्माण केली. सुप्रिया आणि सचिन यांची ओळख झाली ती नवरी मिळे नवऱ्याला या सिनेमादरम्यान.

नवरी मिळे नवऱ्याला या सिनेमातील मोलकरणीच्या भूमिकेसाठी सचिन एक तरुण मुलगी शोधत होते जी त्यांच्याबरोबर शोभून दिसेल. पण त्यांना मनासारखी अभिनेत्री सापडत नव्हती, तेव्हाच सचिन यांच्या आईने त्यांना दूरदर्शन सुरु असलेल्या कार्यक्रमातील सुप्रिया यांचा परफॉर्मन्स दाखवला . सुप्रिया यांना पाहून सचिन यांच्या आई म्हणाल्या,"सुप्रिया सबनीस. अरे आपल्यातीलच आहे. लग्न करून टाक. " तेव्हा सचिन यांनी नकार दिला. टीव्हीतील मुलगी पाहून कसं लग्न करणार असा त्यांचा प्रश्न होता. पण नंतर एका नाटकाच्या जाहिरातीमध्ये त्यांना सुप्रिया यांचं नाव दिसलं. मधुकर तोरडमल यांच्या नाटकात सुप्रिया तेव्हा काम करत होत्या. सचिन त्या नाटकाला गेले. त्यांनी सुप्रियाला प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा त्या खूपच लहान असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

सुरुवातीला सिनेमाच्या निर्मात्यांनी सुप्रिया यांना सिनेमात घेण्यास नकार दिला. त्या वयाने खूपच लहान आहेत असं त्यांचं मत होतं पण नंतर ते राजी झाले. सुप्रिया यांना सिनेमात घेण्याविषयी सचिन आणि त्यांचे निर्माते सतीश यांनी सुप्रिया यांच्या वडिलांशी बोलणं केलं. सुरुवातीला त्यांनी नकार दिला पण नंतर स्क्रिप्ट वाचून ते सिनेमा करण्यास राजी झाले. सिनेमाच्या सेटवर पहिल्यांदा सचिन आणि सुप्रिया यांची भेट झाली. सचिन यांना सुप्रिया पाहतांक्षणीच आवडल्या होत्या. पण त्यांनी ही गोष्ट शूटिंग संपल्यानंतर सांगायची ठरवली.

सिनेमाचं शूटिंग संपलं नंतर त्यांनी त्यांच्या मित्राकरवी सुप्रिया यांना त्यांचा कुणी मित्र आहे का ? असं विचारलं. सुप्रिया यांनी नकार दिला. तेव्हा त्यांनी माझ्या एका मित्राला तू आवडतेस असं विचारलं तेव्हा त्यांनी खोदून खोदून विचारल्यवर सचिन यांचं नाव सांगितलं. ते ऐकल्यावर सुप्रिया यांनी एकच प्रश्न केला. "त्यांचं अजून लग्न नाही झालंय का?" त्यावर सचिन यांच्या मित्राने म्हंटलं,"त्याच लग्न झालं असतं तर तुला कशाला विचारलं असतं ?" मग सुप्रिया या सचिन यांना भेटण्यास राजी झाल्या.

सचिन यांचं नवरी मिळे नवऱ्याला सिनेमातील आला जयराम आला या गाण्याचं शूटिंग सुरु होतं. तेव्हा सुप्रिया त्यांना भेटायला आल्या. सचिन यांनी त्यांना लग्नाबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी चार दिवस वेळ मागितला. पण प्रत्यक्षात दुसऱ्याच दिवशी त्यांनी होकार कळवला. सचिन यांनी ही गोष्ट त्यांच्या आईला सांगितली पण सुप्रिया यांच्या घरी कसं सांगायचं हा प्रश्न सगळ्यांनाच होता कारण त्यावेळी सुप्रिया यांचं वय फक्त सतरा वर्षं होतं. अखेर सुप्रिया यांनी स्वतःहून घरी ही गोष्ट सांगितली. त्यावेळी घरातून खूप विरोध झाला.

अनेकांनी यावेळी मध्यस्थी केली. अखेरीस सचिन यांच्या मावशी आणि काकांनी अरुण सबनीस यांची भेट घेतली. त्यानंतर सचिन सुप्रिया यांचं लग्न ठरलं. नवरी मिळे नवऱ्याला या सिनेमाच्या मुंबई रिलीज वेळी ते दोघं लग्न करणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. २ १ डिसेंबर १ ९ ८ ५ ला या जोडीने लग्न केलं आणि ही नवरी खरोखर नवऱ्याला मिळाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Ravindra Jadeja: मांजरेकरांनी पुन्हा जडेजाच्या बॅटिंगवर केली पोस्ट, यावेळी काय म्हटलंय? वाचा

Latest Marathi News Live Updates : लाडकी बहीण योजनेसाठी गडबड करु नका- मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT