sai tamhankar  esakal
Premier

Sai Tamhankar: करोनानंतर सई ताम्हणकरला करावा लागलेला एन्झायटीचा सामना; म्हणाली- ७ महिने घरात एकटी...

Sai Tamhankar Talked On Depression: आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर पहिल्यांदाच तिच्या मानसिक स्वास्थ्याबद्दल बोलली आहे.

Payal Naik

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं करणारी लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने आपल्या सौंदर्यानेदेखील प्रेक्षकांना भुरळ घातली. तिने मराठी सिनेसृष्टीत अनेक हिट चित्रपटात काम केलं. 'दुनियादारी' या चित्रपटाने सई खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचली. तिच्या हिट चित्रपटांची यादी बरीच मोठी आहे. मराठीसोबतच सई आता हिंदी चित्रपटसृष्टीतही बस्तान बसवतेय. सई सध्या करिअरच्या शिखरावर आहे. तिने स्वतःच्या हिमतीवर हे यश मिळवलं. काही महिन्यांपूर्वीच सईने तिच्या नव्या घरात प्रवेश केला. मात्र सईचा इथपर्यंतचा प्रवास मुळीच सोपा नव्हता. नुकत्याच सकाळ प्रीमिअरला दिलेल्या मुलाखतीत सईने तिचा करोनामधील अनुभव सांगितला आहे.

सध्या अनेक तरुण सर्रास डिप्रेशन मध्ये जाताना दिसत आहेत. मग ते आयटी कंपनीमध्ये काम करणारे असतो किंवा कलाकार. सकाळला दिलेल्या मुलाखतीत सईने तिच्या मानसिक स्वास्थाबद्दल सांगितलं. या मुलाखतीत तिला तू कधी डिप्रेशनची शिकार झाली आहेस का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना सई म्हणाली, 'डिप्रेशन नाही पण मला एन्झायटीचा सामना नक्कीच करावा लागलाय. एन्झायटीपण तितकीच भीतीदायक असते. कारण एन्झायटीमध्ये तुमचे हृदयाचे ठोके फार फास्ट होतात. तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो. तुम्हाला बोलता येत नाही. तुमच्या भावना परमोच्च क्षणाला असतात.'

ती पुढे म्हणाली, 'आता ह्या गोष्टी आहेत. मला वाटतं कोविडनंतर मला एन्झायटी अटॅक एकदा आला होता कारण मी ७ महिने एकटी होते. आपण सगळेच कशाकशातून गेलोय. सगळ्यांचे अनुभव वेगवेगळे आहेत करोनाच्या बाबतीत. डिप्रेशनमध्ये काय होतं हे बाहेरून दिसत नाही. ते खूप आत असतं. ते तसंच आहे ना एक कपल जेव्हा वेगळं होतं तेव्हा आपण असं नाही विचारू शकत कुणाला ए काय झालं तुमच्यात? ते फक्त त्यांनाच माहीत असतं. तसं मेंटल हेल्थचं आहे. ते वरून दिसत नाही काय चाललंय. पण जी माणसं जी लोकं या प्रॉब्लेमशी झगडत असतात त्यांची सतत आत एक लढाई सुरू असते जी कधीच बाहेर नाही दिसत. त्यामुळे मला असं वाटतं की यागोष्टीला इतकं सहज नाही घेतलं पाहिजे.' सईच्या कामाबद्दल सांगायचं तर ती लवकरच 'मानवत मर्डर्स' मध्ये दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

SCROLL FOR NEXT