Salman Khan Movies : अभिनेता सलमान खान (Salman Khan) सध्या खूप चर्चेत आहे. त्याच्या घराव झालेलं गोळीबार प्रकरण असो किंवा त्याचा आगामी सिनेमा 'सिकंदर' (Sikander) चे अपडेट्स. काही ना काही कारणामुळे सलमानच्या नावाची चर्चा सध्या सगळीकडे पाहायला मिळतेय. त्याच्या आगामी 'सिकंदर' (Sikander) सिनेमाविषयी सगळेचजण उत्सुक असतानाच आता 'किक' (Kick) या त्याच्या गाजलेल्या सिनेमाच्या सिक्वेलविषयी एक महत्त्वाची अपडेट समोर येतेय.
सिकंदर सिनेमाचे निर्माते साजिद नादियाडवाला (Sajid Nadiadwala) यांनी 'किक' सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमात सलमान बरोबर जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez), रणदीप हुड्डा (Randeep Hudda), नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आणि संजय मिश्रा (Sanjay Mishra) यांच्या मुख्य भूमिका होत्या. नुकतंच कनेक्ट मीडियाला साजिद यांची पत्नी वर्धा नादियाडवाला (Vardha Nadiadwala) यांनी या सिनेमाचा सिक्वेलचं शूटिंगला का उशीर होतोय या विषयी माहिती दिली.
वर्धा या मुलाखतीमध्ये म्हणाल्या कि, "साजिद यांना हा सिनेमा खूप मोठा बनवायचा आणि त्यासाठी सिनेमाची स्क्रिप्ट उत्तम व्हावी यावर ते काम करत आहेत. 'किक २' ची स्क्रिप्ट जवळपास तयार झाली होती पण चाहत्यांकडून असलेल्या अपेक्षा आणि पहिल्या भागाला मिळालेलं यश कायम राहावं म्हणून या सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम करण्यात येत आहे. या सिनेमाचं शूटिंग सिकंदरचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतरच सुरु होईल."
दरम्यान, 'किक' या सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. हा सिनेमा २०१४ ला रिलीज झाला होता आणि या सिनेमा ४०२ करोड रुपयांची कमाई बॉक्स ऑफिसवर केली होती. काहीतरी थरारक गोष्टी करून स्वतःचं मन शांत करणारा डेव्हील म्हणजेच देवी लाल सिंग लोकांची मदत करण्यासाठी चोऱ्या करू लागतो आणि त्यातून तो गँगस्टर शिवाचं साम्राज्य कसं उध्वस्त करतो याची गोष्ट सांगण्यात आली होती. हा सिनेमा बराच गाजला होता.
सिकंदर हा सिनेमा २०२५ मध्ये रमजान ईद दरम्यान प्रदर्शित होणार असून या सिनेमात सलमान बरोबर अभिनेत्री रश्मिका मंदानाची मुख्य भूमिका आहे. हा सुद्धा एक थरारपट असणार असल्याचं म्हंटलं जातंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.