Sakal Premier Award
Sakal Premier Award  sakal
Premier

Sakal Premier Award : मनोरंजन दुनियेतल्या तेजस्वी हिऱ्यांचा सन्मान ;ठाण्यात रंगला ‘सकाळ प्रीमियर अवॉर्ड’ सोहळा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : चित्रपट तारे-तारका यांची लखलखती उपस्थिती, मायबाप प्रेक्षकांचा भरभरून पाठिंबा, मनोरंजक निवेदन, ताल आणि ठेका धरायला लावणाऱ्या दिलखेचक नृत्य-गायनाचा बहारदार करमणुकीचा कार्यक्रम, अशा रंगतदार वातावरणात ‘सकाळ प्रीमियर अवॉर्ड २०२४’ या सोहळ्यात ज्येष्ठ चित्रपट निर्माते-अभिनेते महेश कोठारे आणि प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या मनोरंजन क्षेत्रातील प्रदीर्घ कारकिर्दीचा विशेष सन्मान करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या सोहळ्यात मनोरंजन क्षेत्रातील अनेक तेजस्वी हिऱ्यांचा सन्मान या सोहळ्यात करण्यात आला.

ठाण्याच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या सोहळ्यात आज सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक, छाया दिग्दर्शक, संकलन, मार्केटिंग-वितरण, खलनायक, संवाद, पटकथा, कथा, गीतकार, शिवछत्रपती क्षेत्रातील तंत्रज्ञान यांना गौरविण्यात आले. पुष्कर श्रोत्री व सारंग साठे यांच्या निवेदनाने आणि प्राजक्ता माळी हिच्या नृत्याने कार्यक्रमाला जणूकाही ‘चार चाँद’ लावले.

गेले अनेक दिवस या सोहळ्याबद्दल मनोरंजनविश्वातील कलावंतांसह त्यांच्या चाहत्यांमध्येही उत्सुकता होती. प्रिया बेर्डे, सौरभ गाडगीळ, राहुल रानडे, समीर कक्कड आदी ज्युरींनी महत्प्रयासाने पुरस्कार विजेत्यांची अंतिम निवड केली. आलेली सारीच नामांकने एवढी दर्जेदार आणि एकाहून एक सरस होती की त्यातला कुठला कलाकार पुरस्कारासाठी निवडायचा, हा कठीण प्रश्‍न पडल्याचे ज्युरींनी यापूर्वीच प्रांजळपणे कबूल केले होते. आजच्या समारंभात या उत्सुकतेवरील पडदा दूर सारण्यात आला आणि विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली. उत्कृष्ट चित्रपटांच्या निर्मितीला सहाय्य करणारे हे कलाकार, तंत्रज्ञ यांना गौरवताना जणूकाही आकर्षक दागिन्यांमधील तेजस्वी हिऱ्यांचा सन्मान ‘सकाळ’ने केला, अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांनी व्यक्त केली.

पुरस्कार वितरणाचे वातावरण हे अत्यंत रोमांचक होते. नामांकने जाहीर झाल्यावर कोणाला बक्षीस मिळणार, हे जाहीर होईपर्यंत ते कलाकार, त्यांचे नातलग व प्रेक्षकही श्‍वास रोखून बसत होते. नाव जाहीर झाले की, त्यांच्यातील हर्षोल्हास अक्षरशः टाळ्या, शिट्ट्या, आलिंगने, हस्तांदोलन, नाच याप्रकारे उत्स्फूर्तपणे व्यक्त होत होता. ‘सकाळ प्रीमियर अवॉर्ड’ हा सन्मानाचा पुरस्कार मिळाल्याने आपल्या कलेच्या सादरीकरणाला मान्यताच मिळाली, अशीच भावना या पुरस्कार विजेत्यांची होती.

पुरस्कार विजेते

फैजल आणि इम्रान महाडिक (चित्रपट आत्मपॅम्फ्लेट) यांना सर्वोत्कृष्ट संकलन, ‘सुभेदार’चे प्रतीक रेडीज यांना सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शक, ‘सुभेदार’च्या प्रियांका मयेकर यांना सर्वोत्कृष्ट छाया दिग्दर्शक, ‘रावरंभा’चे अभिनेते संतोष जुवेकर यांना सर्वोत्कृष्ट खलनायक, दिग्पाल लांजेकर यांना सर्वोत्कृष्ट संवादासाठी, तर ‘बापल्योक’ चित्रपटाचे मकरंद माने आणि विठ्ठल काळे यांना सर्वोत्कृष्ट पटकथा आणि गुरू ठाकूर यांना सर्वोत्कृष्ट गीतकार, असे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar: "गैरसमजातून गुन्हे दाखल केले," सर्व गुन्हे मागे घेत रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांची क्लीन चीट

Dhirubhai Ambani Story: धीरूभाई अंबानींनी माती विकून असे कमावले होते पैसे, IPO आधी 3 वेळा बदलले होते रिलायन्सचे नाव

Hathras Stampede: "देव आपल्याला..." हाथरस दुर्घटनेप्रकरणी भोले बाबा पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर; पाहा व्हिडिओ

Team India Victory Parade : कोहली, जडेजाचा मुंबई पोलिसांना सॅल्यूट! मिरवणुकीचे व्यवस्थापन अव्वल दर्जाचे

Maharashtra Congress: काँग्रेस धमाका करण्याच्या तयारीत? घेतला शरद पवार, उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढवणारा निर्णय

SCROLL FOR NEXT