Sakal Premier Film Award Ceremony nominations final stage of preparation Sakal
Premier

Sakal Premier Film Award Ceremony : प्रीमियर पुरस्कार नामांकनांची अवघ्या चित्रपटसृष्टीला उत्सुकता

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मनोरंजन क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘सकाळ प्रीमियर चित्रपट पुरस्कार सोहळ्या’ची उत्सुकता आता सर्वांनाच लागून राहिली आहे. चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या बरोबरीने सिनेरसिकही पुरस्कार सोहळ्याच्या नामांकनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पुरस्कारासाठी अनेक चित्रपटांनी नोंदणी केली असून लवकरच सोहळ्याची नामांकने जाहीर केली जाणार आहेत.

‘सकाळ प्रीमियर चित्रपट पुरस्कार सोहळ्या’चे यंदाचे चौथे वर्ष आहे. ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात बुधवार, १२ जून रोजी सायंकाळी ६ वाजता यंदाचा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. पी. एन. जी. ज्वेलर्स लिमिटेड या सोहळ्याचे मुख्य प्रायोजक आहेत.

पहिला पुरस्कार सोहळा २०१७मध्ये मुंबईत, तर दुसरा सोहळा पुणे शहरात मोठ्या जल्लोषात झाला. तिसरा सोहळा ठाणे शहरात गेल्या वर्षी रंगला. पुरस्काराचा यंदाचा चौथा सोहळाही परंपरेनुसार भव्य स्तरावर आयोजित करण्यात आला आहे.

मनोरंजन सृष्टीतील मान्यवर मंडळींसह सामाजिक, उद्योजक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी त्यास उपस्थित राहणार आहेत. आतापर्यंत अनेक चित्रपटांच्या प्रवेशिका दाखल झालेल्या आहेत.

२०२३मध्ये प्रदर्शित झालेल्या अनेक दर्जेदार चित्रपटांचा त्यात समावेश आहे. गेल्या वर्षात एकापेक्षा एक चित्रपट, कलाकार, बालकलाकार, लेखक, गायक आणि संगीतकार मराठी चित्रपटसृष्टीला मिळाले आहेत. ‘प्रीमियर सोहळ्या’च्या निमित्ताने त्यांना उत्तेजन देऊन, अनेक पुरस्कार देऊन त्यांच्या कलेचा यथोचित गौरव करण्यात येणार आहे.

विविध गटांमध्ये पुरस्कार

सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेता, कथा, गीतकार, संगीतकार आदी विविध गटांमध्ये पुरस्कार दिले जाणार आहेत.  मान्यवर परीक्षकांकडून सहभागी सर्व चित्रपटांचे परीक्षण सध्या सुरू असून सर्वोत्कृष्ट चित्रपट वा कलाकारांची निवड करताना त्यांचाही कस लागत आहे. एकमेकांशी सविस्तर चर्चा करून आणि प्रत्येक कलाकृतीचे बारकावे लक्षात घेऊन गुणवत्तेच्या निकषानुसार योग्य तो निकाल लावण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू असून लवकरच नामांकने जाहीर केली जातील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT