Salman Khan esakal
Premier

Salman Khan : सलमान खानने सांगितली बिश्नोईची सगळी स्टोरी; गोळीबार प्रकरणात दिलेला जबाब झाला उघड

Salman Khan Statement : ''मी सिनेसृष्टीत मागच्या ३५ वर्षांपासून काम करत आहे. वांद्र्यातल्या बँडस्टँडजवळ गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये मी राहातो. फॅन्ससाठी मी नेहमी बालकनीमध्ये येत असतो. घरामध्ये पार्टी असेल किंवा घरच्यांसोबत वेळ घालवायचा असेल तर मी बालकनीमध्ये असतो. मी माझ्यासाठी खासगी सुरक्षा ठेवलेली आहे.''

संतोष कानडे

Salman Khan Firing Case: अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ १४ एप्रिल रोजी गोळीबार झाला होता. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने हे प्रकरण गांभिर्याने घेत तपासाची चक्र वेगाने फिरवले होते. सलमानला काही वर्षांपूर्वी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरु केला.

गोळीबार करणारे आरोपी दुचाकीवरुन आले होते, त्यांनी सलमानच्या घराबाहेर काही राऊंड फायर केले आणि तिथून पळून गेले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्या आरोपींना पकडलं होतं. या प्रकरणी सुपरस्टार सलमान खानचा जबाबही पोलिसांनी रेकॉर्ड केला होता. तो जबाब 'आज तक'ने प्रसिद्ध केला आहे.

मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने गोळीबार प्रकरणातील चार्जशीट दाखल केलं आहे. सलमानने दिलेला जबाब चार्जशीटमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. आपल्या जबाबबामध्ये सलमान खानने फायरिंगबद्दल माहिती दिली आहे. फायरिंग झाली त्यावेळी आपण कुठे होतो? काय करत होतो? याबद्दल सांगितलं आहे. ४ जून रोजी क्राईम ब्रँचच्या अँटी एक्स्टॉर्शन सेलने सलमानचा जबाब नोंदवला होता.

जबाबामध्ये सलमानने काय सांगितलं...

''मी सिनेसृष्टीत मागच्या ३५ वर्षांपासून काम करत आहे. वांद्र्यातल्या बँडस्टँडजवळ गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये मी राहातो. फॅन्ससाठी मी नेहमी बालकनीमध्ये येत असतो. घरामध्ये पार्टी असेल किंवा घरच्यांसोबत वेळ घालवायचा असेल तर मी बालकनीमध्ये असतो. मी माझ्यासाठी खासगी सुरक्षा ठेवलेली आहे.''

२०२२ मध्ये माझ्या वडिलांनी वांद्रा पोलिस ठाण्यात एक तक्रार दाखल केली होती. माझ्या वडिलांना एक पत्र मिळालं होतं. ज्यात माझ्या कुटुंबाला धमकी देण्यात आलेली होती. हे पत्र माझ्या अपार्टमेंटच्या दुसऱ्या बाजूच्या बेंचवर ठेवलेलं होतं, असं सलमान म्हणतो.

''मार्च २०२३ मध्ये मला ऑफिशियल ई-मेल आयडीवर माझ्या टीममधील एका कर्मचाऱ्याचा मेल आला होता. ज्यात लॉरेन्स बिश्नोईप्रमाणेच मला आणि माझ्या कुटुंबाला धमकी देण्यात आलेली होती. या प्रकरणीदेखील माझ्या टीमने वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.''

चालू वर्षात जानेवारी महिन्यामध्ये दोन लोकांनी खोटं नाव आणि खोटं ओळखपत्र घेऊन माझ्या पनवेलमधील फार्म हाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. पनवेल तालुका पोलिसांनी त्या दोन लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. हे दोन्ही आरोपी राजस्थानच्या फाजिल्का गावतले होते. हेच गाव लॉरेन्स बिश्नोईचं आहे. मुंबई पोलिसांनी मला वाय प्लस सुरक्षा दिलेली आहे. माझ्यसोबत ट्रेंड पोलिस कर्मचारी, बॉडीगार्ड, प्रायव्हेट सेक्युरिटी बॉडीगार्ड असतात, असं सलमानने जबाबात सांगितलं.

''१४ एप्रिल २०२४ रोजी मी झोपलेलो होतो. तेव्हा मी फटाक्यांसारखा आवाज ऐकला. पहाटे साधारण ४.५५ वाजले होते. पोलिस बॉडीगार्डने मला सांगितलं की, बाईकवर आलेल्या दोघांनी पहिल्या मजल्यावरील बाल्कनीत बंदुकीने फायरिंग केलं. मला माहिती झालंय की, लॉरेन्स बिश्नोईने ही जबाबदारी सोशल मीडियाच्या माध्यमातून घेतली आहे. बिश्नोईच्या गँगनेच माझ्या बाल्कनीत फायरिंग केल्याचा मला विश्वास आहे.''

''माझ्या बॉडीगार्डने वांद्रे पोलिस ठाण्यात १४ एप्रिल रोजी या प्रकरणी एफआयआर दाखल केला होता. लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याची माहिती मला मिळाली आहे. यापूर्वी बिश्नोईने आपल्या गँगच्या माध्यमातून मला मारण्याविषयी मुलाखतीमध्ये भाष्य केलं होतं. मला आणि माझ्या कुटुंबियांना मारण्याचा बिश्नोईचा प्लॅन होता.'' असा जबाब सलमान खानने दिला आहे. त्यावर त्याची सहीदेखील आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrakant Tingare: माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरेंवर हल्ला! पुण्यातील वडगावशेरीत घडली घटना

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'नंतर निर्मात्यांनी केली नव्या सिनेमाची घोषणा ! 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

Rafael Nadal: 'राफा, तू टेनिसमधून ग्रॅज्युएट होतोय, मी अधिक इमोशनल होण्याआधी...', फेडररचं निवृत्त होणाऱ्या नदालला भावनिक पत्र

Latest Marathi News Updates : नागपूर येथील मॅक्स सुपर हॉस्पिटल मधून थोड्याच वेळात माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे यांना उपचारानंतर थोडा वेळात रुग्णालयातून सुट्टी होईल...

Health Tips For Men: पुरूषांनी स्वत:ला लावून घ्याव्यात या दहा सवयी, तरच रहाल फिट अन् फाईन

SCROLL FOR NEXT