सलमान खानच्या निवासस्थानी झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गुन्हे शाखेला सहकार्य करण्यास तयार आहे, असे त्यांच्या वकील रजनी यांनी सांगितले. असे असले तरी पोलीस सध्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या परवानगीची वाट पाहत आहेत जेणेकरुन पुढील चौकशीसाठी गँगस्टरचा ताबा मिळावा.
अंमली पदार्थाच्या गुन्ह्यात गुजरातच्या साबरमती तुरुंगात बंद असलेला बिश्नोई सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेल्या गोळीबारात आरोपी आहे.
2023 मध्ये, गृहमंत्रालयाने ने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 268 अंतर्गत एक आदेश जारी केला होता, ज्यामध्ये बिश्नोईच्या साबरमती तुरुंगातून एका वर्षासाठी बदली करण्यास मनाई होती. हा कालावधी 30 ऑगस्ट 2024 रोजी संपला आहे. याबाबतचे वृत्त फ्री प्रेस जर्नलने दिले आहे.
त्यानुसार, गुन्हे शाखेने सर्व कागदपत्रे गृह मंत्रालयाकडे पाठवली आहेत. आता गोळीबार प्रकरणात चौकशीसाठी बिश्नोई ताब्यात घेण्यासाठी मंत्रालयाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.
गॅलेक्सी गोळीबार प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या 1,735 पानांच्या आरोपपत्रात, बिश्नोई आणि त्याच्या टोळीने केलेल्या कथित गुन्ह्यांचा तपशील आहे. हा खटला अधिकाधिक चिघळू नये यासाठी त्याची कोठडी लवकरात लवकर मिळावी, यासाठी गुन्हे शाखा प्रयत्न करत आहे.
लॉरेन्स बिश्नोई हा पंजाबमधील गँगस्टर आहे. त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याचा जन्म 22 फेब्रुवारी 1992 रोजी अबोहर येथे झाला. लॉरेन्स बिश्नोईचे वडील पंजाब पोलिसात हवालदार म्हणून कार्यरत होते.
2022 मध्ये पंजाबी गायक सिद्धू मूसवालाच्या हत्येत त्याचा सहभाग होता. काळवीटाची शिकार केल्याचा आरोप असलेल्या सलमान खानला त्याने 2018 मध्ये जीवे मारण्याची धमकी दिली होती.
यासह बिश्नोईवर अनेक मोठमोठे आरोप आणि गुन्हे दाखल आहेत. तो सध्या गुजरातच्या साबरमती तुरुंगात बंद आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.