Samantha Ruth Prabhu eSakal
Premier

Samantha: मी काही इतकी मूर्ख नाही की... हिला तुरुंगात टाका म्हणणाऱ्या डॉक्टरला सामंथाचं सडेतोड उत्तर

Samantha Ruth Prabhu Reply To Troll Over Medicine: सामंथा धोकादायक वैद्यकीय पद्धतीचा प्रचार करतेय असं म्हणत एका डॉक्टरने तिला सुनावलं होतं.

Payal Naik

Samantha On Doctors Reaction Over Medicine: लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा हिने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट करत व्हायरल इन्फेक्शन्सवर उपचार घेण्यासाठी हायड्रोजन पेरोक्साइड नेब्युलायझेशन वापरण्याचा सल्ला दिला होता. आपण स्वतःही ते वापरत असल्याचं तिने सांगितलं होतं. मात्र एका डॉक्टरने तिच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत तिला सुनावलं होतं. या तंत्राचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो असं त्याने सांगितलं आणि सामंथाला आरोग्य आणि विज्ञान विषयातील अडाणी व्यक्ती असं म्हटलं होतं. आता एक पोस्ट करत सामंथाने यावर उत्तर दिलं आहे.

सामंथाने पोस्ट करत लिहिलं, 'गेल्या काही वर्षांमध्ये, मला अनेक प्रकारची औषधे घ्यावी लागली आहेत. मला जे काही घेण्याचा सल्ला दिला गेला होता त्या सर्व गोष्टी मी आजमावून पाहिल्या आहेत. यापैकी बरेच उपचार खूप महागडे देखील होते. मी किती भाग्यवान आहे की मी ते घेऊ शकले. मी पारंपरिक उपचारांनी बरी झालेली नाही. त्यामुळे मी औषधांवर खूप रिसर्च केला. आणि अनेक गोष्टी वापरून पाहिल्या. औषधांवर खूप खर्चही केला. उगीच कोणतीही औषधं सुचवायला मी मूर्ख नाही. मी फक्त चांगल्या हेतूने ते सुचवलं होतं कारण मी ते स्वतः वापरलं.'

तिने पुढे लिहिलं, 'एका गृहस्थांनी माझ्या पोस्टवर आणि माझ्या हेतूंवर शंका उपस्थित केली. ते गृहस्थही डॉक्टर आहेत. त्यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे यात शंका नाही. आणि मला खात्री आहे की त्यांचा हेतू उदात्त होता.मात्र त्यांचे शब्द आणि सांगण्याची पद्धत इतकी वाईट नसती तर त्यांनी सांगितलेली गोष्ट जास्त उपयोगी ठरली असती. विशेषत: जिथे त्यांनी मला तुरुंगात टाकलं पाहिजे असं सुचवलं. हरकत नाही. मला असं वाटतं की हे सेलिब्रिटी असण्याचे तोटे आहेत. मी सेलिब्रेटी म्हणून नव्हे तर वैद्यकीय उपचारांची गरज असलेली व्यक्ती म्हणून पोस्ट केली.

तिने पुढे लिहिलं, 'मी पोस्टमधून पैसे कमावले नाहीत किंवा कोणाचं समर्थन करत नाही. पारंपारिक औषधोपचार त्यांच्यासाठी काम करत नसल्यामुळे पर्याय शोधत असलेल्या इतरांसाठी, मी स्वतः उपचार घेतल्यानंतर एक पर्याय म्हणून फक्त उपचार सुचवत होते. विशेषतः अधिक परवडणारे पर्याय. त्या गृहस्थांनी माझ्यावर आरोप करण्याऐवजी माझ्या डॉक्टरांशी चर्चा केली असती तर बरं झालं असतं. औषधं काम करत नसतील तर मी हार मानायला तयार नाही. माझ्या औषधांबद्दल सांगण्याबद्दल मी अधिक सावध राहीन कारण माझा हेतू फक्त त्यांना मदत करणं होता.

सामंथाने लिहिलं, 'माझ्याकडे आयुर्वेद, होमिओपॅथी, ॲक्युपंक्चर, तिबेटी औषध, प्राणिक उपचार इत्यादी सुचवणारे अनेक अर्थपूर्ण लोक आहेत. मी ते सर्व ऐकलं. मी पण असंच काहीतरी करत होते. प्रत्येक उपचाराच्या बाजूने आणि विरुद्ध अशी दोन्ही बाजूने मतं मांडणारी लोकं आहेत. पण चांगल्या गोष्टी सांगणारे लोक मिळणं कठीण आहे.' तिच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी तिची बाजू घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT