sanjay dutt esakal
Premier

वयाच्या ६५ व्या वर्षी संजय दत्तने पुन्हा केलं लग्न? तिसऱ्या पत्नीसोबत सप्तपदी घेतानाचा व्हिडिओ व्हायरल

Payal Naik

बॉलिवूडचा संजू बाबा म्हणजेच संजय दत्त पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. संजय दत्तने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याच्या चित्रपटांइतकंच त्याचं वैयक्तिक आयुष्यही चाहत्यांमध्ये तितकंच चर्चेत राहिलं. आता पुन्हा एकदा संजय नेटकऱ्यांमध्ये चर्चेत आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो सात फेरे घेताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते बुचकळ्यात पडले आहेत. संजूबाबाने पुन्हा लग्न केलंय का असा प्रश्न आता चाहते विचारताना दिसतायत. हो, हा व्हिडिओ खरा असून संजयने पुन्हा त्याची तिसरी पत्नी मान्यता हिच्यासोबत सात फेरे घेतले आहेत. पण त्याने लग्न केलेलं नाही.

हा व्हायरल व्हिडिओ संजय दत्तच्या घरातला असल्याचं म्हटलं जात आहे. नुकतंच संजय आणि मान्यता यांच्या घराच्या नूतनीकरणाचं काम करण्यात आलं होतं, आता ते पूर्ण झालं. त्यासाठी एक घरगुती पूजा आयोजित करण्यात आली होती. या पूजा सोहळ्यात संजू बाबा आणि मान्यता यांनी फेरे घेतले. हा या पूजेचा एक विधी होता. या व्हिडिओमध्ये संजयने भगव्या रंगाचा कुर्ता-पायजमा आणि ब्लाउज परिधान केला आहे, तर मान्यताही अगदी साध्या कपड्यात दिसत आहे.

संजयच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं तर चार दशकांच्या कारकिर्दीत 135 हून अधिक चित्रपट केलेल्या 65 वर्षीय संजय दत्तने तीन वेळा लग्न केलं आहे. त्याचं पहिलं लग्न 1987 मध्ये रिचा शर्मासोबत झालं होतं. 1996 मध्ये ब्रेन ट्यूमरमुळे तिचं निधन झालं.

रिया पिल्लईसोबत दुसरं लग्न

संजयचं दुसरे लग्न 1998 मध्ये एअर होस्टेस आणि मॉडेल रिया पिल्लईसोबत झालं होतं. हे नातंही 2008 मध्ये संपुष्टात आलं. त्यानंतर संजयने 2008 मध्ये गोव्यात दिलनवाज शेख उर्फ ​​मान्यता दत्तसोबत लग्न केले. याआधी दोघेही दोन वर्षे डेट करत होते. लग्नाच्या 2 वर्षानंतर दोघेही जुळ्या मुलांचे पालक झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC T20I Ranking: हार्दिक पांड्याला 'बढती'; अर्शदीप सिंगची टॉप १० मध्ये एन्ट्री अन् वॉशिंग्टनलाही फायदा

National Award 2024 : वाळवी सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारायला सिनेमाच्या टीमची अनुपस्थिती ; निर्माती म्हणाली...

Latest Maharashtra News Updates : मोदींच्या हस्ते नागपूर, शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरणाचं भूमिपूजन

PAK vs ENG 1st Test : पाकिस्तानी बॉलरचा ‘पोपट’ झाला! चेंडू स्टम्पला लागला, Harry Brook तरीही नाबाद राहिला, Video

यिनच्या वतीने पुण्यातील विविध महाविद्यालयात वाहतूक व रस्ते सुरक्षा जनजागृती उपक्रमाचे आयोजन.

SCROLL FOR NEXT