Sanjay Dutt Sakal
Premier

Sanjay Dutt: संजय दत्त लोकसभा निवडणूक लढवणार की नाही? स्वत:च दिलं स्पष्टीकरण

अभिनेता संजय दत्तने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. संजय दत्त काय म्हणाला पहा..

सकाळ डिजिटल टीम

Sanjay Dutt News: बाॅलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) हा देशातील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक आहे, तसेच त्याचे कुटुंबीय राजकारणात सक्रिय आहेत, त्यामुळे संजय दत्त यंदाची लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

लोकसभा निवडणूकांपूर्वी तो हरियाणाच्या करनाल मतदार संघातून काॅंग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु आता संजय दत्त याने यावर आपले मत व्यक्त केले आहे.

संजय दत्तने आपल्या अधिकृत ट्विटर आकाऊंटवरुन आपण निवडणूक लढवणार नसल्याची माहिती दिली आहे.

तो म्हणाला, मी राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या अफवांना पुर्णविराम देऊ इच्छितो. मी कोणत्याही पक्षात सामील होणार नाहीये किंवा निवडणूक लढवणार नाहीये. जर मी निवडणूकीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, तर सर्वप्रथम मी त्याची घोषणा करेन. सध्या माझ्याबद्दल ज्या अफवा पसरवल्या जात आहेत, त्यावर विश्वास ठेवणे टाळा.

यापूर्वी २००९ च्या लोेकसभा निवडणूकीत संजय दत्त याला समाजवादी पक्षाकडून उमेदवारी जाहिर झाली होती. तो लखनौ या मतदार संघातून निवडणूक लढवणार होता परंतु, सीबीआयने त्याला मिळालेल्या शिक्षेचा दाखला देत त्याची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली, त्यामुळे तो सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार २००९ सालची लोकसभा निवडणूक लढवू शकला नव्हता.

अभिनेता संजय दत्त याचे कुटुंब राजकारणामध्ये सक्रिय आहे. त्याची बहिण प्रियांका दत्त ही एक सामाजिक कार्यकर्ता आहे, तसेच कुटुंबातूनच राजकारणाचे धडे मिळाल्यामुळे ती सुद्धा राजकारणात सक्रिय असते.

प्रिया दत्त ही उत्तर पश्चिम मुंबई या मतदार संघाची माजी खासदार आहेत. ती दिवंगत अभिनेते आणि राजकारणी सुनिल दत्त यांची कन्या आहे. सुनिल दत्त हे २००४-०५ साली मनमोहन सिंग यांच्या सरकारमधील युवा कार्य व क्रिडा विभागात कॅबिनेटमंत्री होते. राजकारणाबरोबरच त्यांना समाजकारणाची सुद्धा आवड होती.

सध्या बाॅलिवूडमधील अनेक कलाकार राजकारणात प्रवेश करत आहेत. काही दिवसांपूर्वीच बाॅलिवूड अभिनेता गोविंदा याने शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश केला आहे. तसेच बाॅलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगणा रणावत सुद्धा लोकसभा निवडणूक लढवणार आहे. तीला भाजपकडून हिमाचलप्रदेशमधील मंडी मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT