sara ali khan  sakal
Premier

Sara Ali Khan: ड्रेसवर ज्यूस पडल्याने संतापली सारा अली खान; एअर होस्टेसला लूक देत सरळ निघून गेली, व्हिडिओ व्हायरल

Payal Naik

बॉलिवूड कलाकारांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांचं वागणं, बोलणं कसं असतं हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हिचादेखील असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय.सारा ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असते. ती कोणत्याना कोणत्या कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ती तिच्या चांगल्या स्वभावासाठीही ओळखली जाते. मात्र आता तिचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे ज्यात ती रागावलेली दिसत आहे. तिच्या ड्रेसवर ज्यूस सांडल्याने ती रागात एअर होस्टेसला बघताना दिसतेय.

या व्हिडिओमध्ये साराने गुलाबी ड्रेस घातला आहे. ती एका विमानात बसली आहे. तिच्या आजूबाजूला क्रू मेंबर उभे आहेत. ती रागात उभी राहते आणि तिथे उभ्या असलेल्या एअर होस्टेसकडे ती रागात बघते आणि तिथून उठून निघून जाते. या व्हिडिओवर चाहते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. चाहते तर हे बघून चकीत झाले आहेत की ती बिझनेस क्लासऐवजी इकॉनॉमी क्लासने प्रवास करत आहे. एकीकडे काही चाहते हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं सांगत आहेत तर दुसरीकडे हा व्हिडिओ एका जाहिरात किंवा चित्रपटाचं शूटिंग असल्याचं सांगण्यात येतंय.

काही नेटकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सारा कधीच अशा प्रकारची प्रतिक्रिया देणार नाही. ती खूप चांगली अभिनेत्री आहे. तिच्या वागण्यावरून हे स्पष्ट होतंय की हे शूटिंग सुरू आहे. यापूर्वी सारा भाऊ इब्राहिम अली खान याच्यासोबत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात दिसली होती. असं म्हटलं जातं की या कार्यक्रमात जान्हवी कपूर आणि सारा एकमेकांपासून अंतर ठेवून वागत होत्या. असं वाटत होतं की जान्हवी तिला टाळण्याचा प्रयत्न करत होती. मात्र त्यांनी एकत्र ट्रिप देखील केल्या आहेत. त्यांनी करण जोहरच्या कार्यक्रमात एकत्र हजेरी लावली होती. तिच्या कामाबद्दल सांगायचं तर ती लवकरच 'मेट्रो इन दिनों' या चित्रपटात दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT