seema sajdeh on salman  esakal
Premier

संकटासमोर सलमान पाय रोवून... सीमा सजदेहने केलं दीराचं कौतुक, म्हणाली- मलायकाच्या वडिलांच्या निधनावेळी तो

Seema Sajdeh Praises Salman Khan : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता सलमान खान याची भावजय सीमा सजदेह हिने तिच्या दीराचं म्हणजेच सलमान खानचं कौतुक केलं आहे.

Payal Naik

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा सजदेह यांनी २०२२ मध्ये घटस्फोट घेतला. लग्नाच्या इतक्या वर्षानंतर ते वेगळे झाले. मात्र खान कुटुंबाच्या सुना आणि खान कुटुंबातला जिव्हाळा अजूनही तसाच आहे. याची प्रचिती तेव्हा आली जेव्हा मलायका अरोरा हिच्या वडिलांनी आत्महत्या केली आणि तिला सांभाळण्यासाठी संपूर्ण खान कुटुंब रात्रीच त्यांच्या घरी पोहोचलं. २०१७ मध्ये मलायका आणि अरबाज यांचा घटस्फोट झाल्यानंतर सलमान इतक्या वर्षांनी मलायकाला भेटला होता. आता सोहेलची पूर्व पत्नी सीमा हिने एका मुलाखतीत आपल्या दीराचं कौतुक केलं आहे.

मलायका आणि अरबाज यांनी १९९८ मध्ये लग्न केलं होतं. पण सात वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला. मात्र जेव्हा मलायकावर दुःखाचा डोंगर कोसळला तेव्हा सलमान आणि त्याचं संपूर्ण कुटुंब तिथे उपस्थित होतं. त्या काळात ते तिला धीर देत होते. सोशल मीडियावर खान कुटुंबाच्या या गोष्टीचं कौंटुक झालं. अशातच आता सीमा हिने सलमानचं त्याच्या वागण्यासाठी कौतुक केलंय. सीमाने नुकतीच न्यूज १८ ला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना ती म्हणाली, 'सलमान एका डोंगरासारखा आहे. जेव्हा कोणतंही संकट येतं. त्याच्यावर किंवा त्याच्या कुटुंबातील कुणावरही, किंवा तुम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज असते तेव्हा ते सगळे तिथे उपस्थित असतात. त्यांची हीच एक गोष्ट त्यांना एक कुटुंब बनवते.'

सलमानच्या स्वतःच्या जीवाला सध्या धोका आहे. गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई वारंवार त्याला जीवे मारण्याच्या धमक्या देतोय. मात्र अशातच सलमान त्याच्या कुटुंबाबद्दल विचार करताना दिसतो. सीमा सजदेह बद्दल सांगायचं तर, तिने 2022 मध्ये सोहेल खानपासून घटस्फोट घेतला. सध्या सीमा विक्रम आहुजाला डेट करत आहे. सोहेलशी लग्न करण्यापूर्वी विक्रमसोबत तिचा साखरपुडा झाला होता. सीमा 'फॅब्युलस लाईफ ऑफ बॉलिवूड वाइफ्स' मध्येही दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirol : उद्यानसम्राट आमदारकीच्या आखाड्यात! राजू शेट्टींच्या घरच्या मतदारसंघात काँग्रेसने खेळला हुकमी एक्का

तिच्यासारख्या लोकांसोबत... जेव्हा अमृता सिंगने रवीना टंडनला दिलेली शिवी; सैफ अली खान ठरलेला कारण

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं स्टार प्रचारकांची यादी केली जाहीर

Jayashree Thorat : जयश्रीताई आमच्या मुलीसारख्या... कडक कारवाई होणार...भाजप नेत्याच्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल पक्षाची स्पष्ट भूमिका

Amit Thackeray: दोन ठाकरे कधीच एकत्र येणार नाहीत... अमित ठाकरेंनी विषयच संपवला! नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT