Premier

Video : "तू ड्रग्ज घेतेयस का ?" ; प्रीतीच्या कृतीने वैतागलेल्या शाहरुखने विचारला प्रश्न , पहा व्हिडीओ

सकाळ डिजिटल टीम

Viral Video : शाहरुख खान आणि प्रीती झिंटा ही बॉलिवूडमधील गाजलेल्या जोड्यांपैकी एक जोडी. या दोघांनी एकत्र काम केलेले बरेच सिनेमे गाजले. सोशल मीडियावर सध्या या दोघांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यात डान्स प्रॅक्टिस करताना शाहरुखने प्रीतीला विचारलेल्या प्रश्नामुळे सगळेचजण चकित झाले.

व्हायरल व्हिडीओ

2004 मध्ये यूएस मध्ये झालेल्या त्यांच्या स्टेज परफॉर्मन्सच्या रिहर्सलच व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख आणि प्रीती डान्स प्रॅक्टिस करत असून प्रीतीला एक स्टेप जमत नाहीये. त्यामुळे शाहरुख तिला शिकवत असल्याचं पाहायला मिळालं. प्रीतीचा झालेला गोंधळ पाहून वैतागलेल्या शाहरुखने हसत तिला ,"तू सध्या ड्रग्ज घेतेयस का?" असं विचारलं त्यावर हसत प्रीतीने "मलाही तसंच वाटतंय" असं उत्तर दिलं. त्यावर शाहरुख हसला आणि तिला पुढील स्टेप समजवायला लागला असं दिसतंय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेत आहे.

प्रीतीची आठवण

याआधी प्रितीने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. तिने कॅप्शन दिले होते, “हे आम्ही एका अवॉर्ड शोसाठी रिहर्सल करत होतो. मला आठवते की मला 2 दिवस झोप लागली नाही आणि मला झोम्बीसारखे वाटले. पण शाहरुखने मला मदत करत आमचा डान्स छान बसवला."

शाहरुख आणि प्रीतीने दिल से, कभी अलविदा ना कहना, वीर-झारा आणि कल हो ना हो या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं होतं. त्यांचे हे सगळे सिनेमे गाजले होते. दिल से सिनेमातील प्रीती आणि शाहरुखवर चित्रित झालेलं 'जिया जले' हे गाणं आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. बराच काळ ही जोडी प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर एकत्र पाहता आली नाहीये. प्रीती लवकरच 'लाहोर १९४७' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. भारत-पाक फाळणीवर हा सिनेमा बेतलेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT