kaushal Inamdar  esakal
Premier

आणि त्यांनी थेट इटलीच्या मुसोलिनीसमोर व्हायोलिन वाजवलं... कौशल इनामदारांनी सांगितला आजोबांचा किस्सा

Payal Naik

Shankarrao Biniwale Unknown Facts: लोकप्रिय गायक आणि संगीतकार कौशल इनामदार यांनी मराठी सिनेसृष्टीला अप्रतिम अशी गाणी दिली. अनेक अजरामर मराठी मालिकांची शीर्षकगीतं आजही प्रेक्षक आवडीने ऐकतात. मराठीसोबतच हिंदीमध्येही त्यांचं नाव आहे. मात्र कौशल इनामदार हे शंकरराव बिनीवाले यांचे नातू आहेत ही गोष्ट अनेकांना ठाऊक नसेल. इटलीचा सर्वेसर्वा मुसोलिनी यांच्यासमोर व्हायोलिन वाजवणारे शंकरराव हे पहिले भारतीय ठरले होते. स्वतः मुसोलिनीने स्वतः त्यांना बोलावलं होतं. त्यांचं कौतुक केलं होतं. ही संधी मिळालेले ते पहिले भारतीय होते, पण हे कसं घडलं, तेव्हा नेमकं काय झालं होतं हे कौशल यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

कौशल यांनी नुकतीच मित्र म्हणेच्या पॉडकास्टला हजेरी लावली होती. या मुलाखतीत ते म्हणाले, 'माझे आजोबा शंकरराव बिनीवाले हे व्हायलोनिस्ट होते आणि प्रभात निर्मिती संस्थेचे जे पहिले सिनेमे होते 'अयोध्येचा राजा' वगरे त्यात त्यांनी व्हायोलिन वाजवलंय. ते आधी थोडेफार शिकले होते आपण त्यांना असं वाटलं की आपण परदेशात जाऊन याचं संपूर्ण योग्य शिक्षण घेतलं पाहिजे. म्हणून ते इटलीला गेले. इटलीमध्ये त्यांचं इतकं नाव झालं की मुसोलिनीने त्यांना बोलावलं. तर हे बालगंधर्वांचे भक्त म्हणून मुसोलिनीसमोर गेले आणि भा. द. खेरांच्याच पुस्तकात याचा उल्लेख आहे की मुसोलिनीने १५ मिनिटांची भेट दिली पण ती ४५ मिनिटं चालली. आणि त्या ४५ मिनिटात माझ्या आजोबांनी मुसोलिनीला रागदारी संगीत आणि बालगंधर्वांची नाट्यगीतं ऐकवली. हे सगळं १९३३ साली घडलं होतं.'

शंकरराव बिनीवाले कोण होते?

शंकर गोपाळ ऊर्फ अप्पासाहेब बिनीवाले यांचा जन्म पुण्यातील सरदार बिनीवाले यांच्या घराण्यात झाला. त्यांना व्हायोलिन वादनाचा छंद जडला. त्यांनी गजाननराव जोशी यांच्याकडून याचं शिक्षण घेतलं. त्याकाळी सुरू झालेल्या मूकपटासाठी ते संगीत तयार करायचे. प्रभात कंपनीच्या ‘अयोध्येचा राजा’ या चित्रपटाचे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक गोविंदराव टेंबे यांनी चित्रपटाच्या पार्श्वसंगीतात व्हायोलिन वादनाकरिता त्यांना बोलावून घेतलं होतं. त्यानंतर ते आणखी शिक्षण घेण्यासाठी परदेशी गेले. शंकरराव इंग्लंडला गेल्यावर त्यांचे अनेक थिएटरांमध्ये कार्यक्रम झाले. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या प्रसारण सेवेवरही शंकररावांचा व्हायोलिनवादनाचा कार्यक्रम झाला. असा मान मिळालेले ते पहिलेच भारतीय होते.

वर्षभराने ते भारतात परत आले. त्यानंतर ‘श्यामसुंदर’, ‘अयोध्येचा राजा’, ‘सत्यवान सावित्री’ अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी व्हायोलिन वाजवले, तसेच ‘राधामाई’, ‘कुलवधू’ या नाटकांमधून व्हायोलिनवादन केले. त्यानंतर मुंबईत एका रेकॉर्डिंग कंपनीत आणि आकाशवाणीवर ते काम करत होते. गजानन खेर, व्हायोलिना उमराणीकर, रमाकांत परांजपे हे त्यांचे शिष्य पुढे नावारूपाला आले. भारतीय संगीतात त्यांचा महत्वपूर्ण वाटा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast : तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! ते राज्यात तिसरी आघाडी जाहीर

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

SCROLL FOR NEXT