Sharmin Segal
Sharmin Segal Esakal
Premier

Heeramandi : "माझ्यावरचा तिरस्कार आता टोकाला पोहोचला"; अखेर ट्रोलिंगवर शर्मीन झाली व्यक्त

सकाळ डिजिटल टीम

Sharmin Segal : 'हिरामंडी' या वेब सिरीजमुळे अभिनेत्री शर्मीन सेगल बराच काळ ट्रोलिंगचा सामना करतेय. तिच्या या वेबसिरीजमधील परफॉर्मन्स अनेकांना पसंत पडला नाही. तिने साकारलेली आलमझेब अनेकांना आवडली नाही. यावर शर्मीनने अखेर भाष्य केलं.

"त्यांच्या तिरस्काराने आता सहनशीलतेचं टोक गाठलंय"

झूम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत शर्मीनने अखेर यावर मौन सोडलं. ती म्हणाली,"मला माहितीये आलमझेबची भूमिका साकारण्यासाठी मी बरीच मेहनत घेतली आहे. त्यानंतर प्रेक्षकांना माझं काम आवडतंय कि नाही हे त्यांच्यावर अवलंबून आहे. मला आता असं वाटतंय कि त्यांच्या तिरस्काराने आता सहनशीलतेचं टोक गाठलंय पण माझ्या घरची मंडळी माझा आधार आहेत आणि ते मला याला सामोरं जाण्यासाठी मदत करतात. "

"मी मीनाकुमारींची भावशून्यता माझ्या आणण्याचा प्रयत्न केला असं म्हंटलं होतं पण लोकांनी त्याचा उलट अर्थ काढून मी मीनाकुमारी यांना कॉपी करण्याचा प्रयत्न केला किंवा मी माझी तुलना त्यांच्याशी करतेय असं अनेकांनी म्हटलं पण तसं नव्हतं त्यांनी त्या सिनेमात जे कायम त्यांच्या आसपास घडणाऱ्या गोष्टींवर प्रतिक्रिया न देण्याचं शून्यपण साकारलं होतं ते आणण्याचा प्रयत्न केला असं मला म्हणायचं होतं. "

या आधीही शर्मीनने मांडली स्वतःची बाजू

या आधीही शर्मीनने तिच्यावर होणाऱ्या ट्रोलिंगबाबत स्वतःची बाजू मांडली होती. यावर तिने ती या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करते असं उत्तर दिलं होतं आणि वेब सीरिजमधील इतर कलाकारांनीही तिची बाजू घेऊन प्रेक्षकांना खडेबोल सुनावले होते.

शर्मीनचा अदिती आणि संजिदाबरोबर बेबनाव

या आधी संजिदा, अदिती विरुध्द्द शर्मीन असा बेबनाव झाला होता. कलाकार असुरक्षित असतात कि नाही यावरून सगळेजण त्यांचं मत देत होते. त्यावेळी अदितीने एखाद्या कलाकारांविषयी असुरक्षित वाटणं ही खूप चुकीची गोष्ट आहे असं म्हंटलं त्यावर शर्मीनने लगेच तिला तोडत त्यात काहीच चुकीचं नाहीये. असं म्हंटलं होतं तर शर्मीनने संजिदाचा एकप्रक्रारचा आउटसायडर म्हणून अपमान केला होता. यामुळेही तिला ट्रोल केलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Arrival Live Updates : रोहित शर्मा अन् टीम इंडियाचा मोठा उत्साह; बसची वानखेडे स्टेडियमकडे कूच

Hardik Pandya : मुंबईत पोहोचताच वर्ल्डकपची ट्रॉफी हार्दिकच्या खांद्यावर; Video होतोय व्हायरल

Team India Meets PM Modi: बार्बाडोस स्टेडियमच्या मातीची चव कशी होती? PM मोदींच्या प्रश्नावर रोहितनं काय दिलं उत्तर?

Prohibitory Orders: काय झाडी काय डोंगर...फिरायला जायचा प्लॅन करताय? तर थांबा! पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळी प्रतिबंधात्मक आदेश वाचा

Maharashtra Live News Updates: मरिन ड्राईव्ह परिसरात खबरदारीचे मुख्यमंत्र्यांकडून पोलीस आयुक्तांना आदेश

SCROLL FOR NEXT