munjya movie on ott
munjya movie on ott sakal
Premier

Munjya On Ott: गोट्याचं भूत आता प्रेक्षकांच्या घरी येणार; थिएटरनंतर 'या' OTT प्लॅटफॉर्मवर दिसणार 'मुंज्या'

सकाळ डिजिटल टीम

Munjya On Ott: २०२४ मधील सर्वाधिक गाजणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरलेला चित्रपट म्हणजे आदित्य सरपोतदार यांचा 'मुंज्या'. कोकणातल्या मुंज्या या भुताच्या कथेवर आधारित या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलंय. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांना कोकणाची सफर करवून आणली. २०२४ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी हा एक चित्रपट ठरला आहे. मात्र आता हाच मुंज्या तुम्हाला घरबसल्या पाहता येणार आहे. लवकरच 'मुंज्या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे. आता पर्यंत या चित्रपटाने ६४ कोटींची कमाई केली आहे.

'स्त्री', 'रुही', 'भेडिया' याचित्रपटानंतर मॅडॉक सुपरनॅचरल युनिव्हर्समधील ‘मुंज्या’ हा चौथा चित्रपट आहे. उत्तम हॉरर कॉमेडी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना रोमान्सच्या जगातही नेतो. या चित्रपटातील मराठी कलाकारदेखील सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. चित्रपटात एका हट्टी मुलाची एका मुलीशी लग्न करण्याची इच्छा अपूर्ण राहते. त्यापूर्वीच त्याचा मृत्यू होतो. आणि इथूनच खरी कथा सुरू होते. अतिशय वेगळी अशी कथा यानिमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळतेय त्यामुळेच प्रेक्षक तिकीट खिडकीवर गर्दी करत आहेत. आता हाच मुंज्या तुमच्या घरी येणार आहे.

कुठे पाहता येणार चित्रपट?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म Disney + Hotstar वर प्रदर्शित होणार आहे. अभय वर्मा आणि शर्वरी वाघ अभिनीत या चित्रपटाचे डिजिटल अधिकार ओटीटी प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar ने विकत घेतले आहेत आणि आजपासून 2 महिन्यांनंतर हा चित्रपट OTT वर प्रदर्शित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agriculture State Award: महाराष्ट्राला सर्वश्रेष्ठ कृषी राज्य पुरस्कार जाहीर! CM एकनाथ शिंदे स्वीकारणार ...

Virat Kohli : रोहितला सांगितलं मला काही विश्वास वाटत नाहीये.... पंतप्रधानांशी बोलताना विराटने केला मोठा खुलासा

Team India Prize: महाराष्ट्र शासनाकडून जगज्जेत्या टीम इंडियाला 11 कोटींचं बक्षीस, मुख्यमंत्री शिंदेची मोठी घोषणा

Eknath Shinde: "सुर्याचा कॅच कोणी विसरणार नाही तसंच आम्ही 50 जणांनी..."; CM शिदेंची राजकीय फटकेबाजी

Maharashtra Live News Updates : माविआचा लवकरच मुंबईत संयुक्त मेळावा होणार

SCROLL FOR NEXT