Shashank Ketkar  Esakal
Premier

Garbage heap outside Filmcity : फिल्मीसिटीबाहेर कचऱ्याचं साम्राज्य ; शशांक केतकरने व्यक्त केली नाराजी

Shashank Ketkar : अभिनेता शशांक केतकरने फिल्मसिटी बाहेर असलेल्या कचऱ्याच्या ढिगाबाबत नाराजी व्यक्त केली.

सकाळ डिजिटल टीम

Shashank Ketkar : मराठी अभिनेता शशांक केतकर कायमच आसपास घडणाऱ्या अनेक समस्यांवर उघडपणे भाष्य करताना दिसतो. ट्रॅफिकची समस्या असो किंवा होर्डिंग प्रकरण शशांकने बऱ्याचदा नागरिकांना सामोऱ्या जाणाऱ्या समस्येबाबत भाष्य केलं आहे.

रस्त्यावर असलेली कचऱ्याची समस्या मुंबईतील नागरिकांना नवीन नाही. रस्त्यावर पडलेल्या या कचऱ्यावर शशांक व्यक्त झाला असून त्याने त्याची नाराजी सोशल मीडियावर व्हिडिओ आणि पोस्टच्या माध्यमातून शेअर केली.

शशांकची पोस्ट

शशांकने सोशल मीडियावर एक व्हिडिओ आणि पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये त्याने फिल्मीसिटीपासून अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर रस्त्यावर टाकलेल्या कचऱ्याबाबत त्याने नाराजी व्यक्त केली. ही जागा पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात त्यांना असं दृश्य पाहायला लागू नये असं त्याने म्हंटलं. सोबत लिहिलेल्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो,"मेरा भारत महान. मोदीजी असोत, राहूलजी असोत किंवा माझ्यासारखी सामान्य जनता असो, हे चित्र भारतात कुठेच अपेक्षित नाहीये. !!!!!

मुंबईची @my_bmc filmcity बघायला भारतातून, जगभरातून लोक येतात तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी हा इतका सुंदर परिसर असावा ही कल्पना कोणाची ???? ही अवस्था , हे चित्र काही आजचं नाहीये… मी गेल्या १० वर्षात ती जागा कधीच स्वच्छ पाहिली नाहीये. इतकी उदासीनता का? हा सगळा कचरा उचलून BMC office समोर ओतला तर आवडेल????? येणारे पर्यटक, कलाकार आणि तिथे राहणारे नागरीक, सगळ्यांच्या माथी हा असला घाणेरडा परिसर का मारला आहे?"

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेबाबतही केलं भाष्य

घाटकोपरमध्ये घडलेल्या होर्डिंग दुर्घटनेबाबतही शशांकने व्हिडीओ शेअर करत नाराजी व्यक्त केली. " काल मुंबईमध्ये एक वादळ आलं त्यात काही घटना घडल्या. त्या घटनांमध्ये घाटकोपरमध्ये जे काही घडलं ते आपण पाहिलंच. १२० फूट बाय १२० फूट एक मोठ्ठच्या मोठ्ठ होर्डिंग पेट्रोल पंपाच्या छतावरती पडलं. दुर्दैवाने त्यावेळी पाऊसही पडत होता त्यामुळे काही जण त्या पेट्रोल पंपच्या छताखाली थांबले होते. दुर्दैवाने तो बोर्ड पडला आणि काहीजणांचा मृत्यू झाला. मला याबाबत कोणत्याच पार्टीला दोष द्यायचा नाहीये कारण ही एक नैसर्गिक आपत्ती होती. पण मला पुन्हा असं वाटत कि आपल्या देशाची लोकसंख्याच इतकी आहे कि इथे आपल्या जीवाची काहीच किंमत नाही. आता बातम्यांमधून कळतंय कि तो बोर्ड अनधिकृत होता त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्या बोर्डचा मालक पळून गेलाय. आपल्या देशात खूप चांगले बदल काही काळापूर्वी घडले आहेत पण अजूनही सुधारणा होणं गरजेचं आहे. सत्ता कुणाचीही असो पण रस्ते सुधारा , रस्त्यावर लावलेले अनधिकृत फ्लेक्स काढून टाका. त्यातून अनेक पक्ष्यांचा जीव जातो आणि आम्हाला ते बघण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये, त्यातून अपघातही होऊ शकतात. " असं तो म्हणाला होता.

शशांकच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांचीही प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली. या आधीही शशांकने बऱ्याच समस्यांबाबत उघडपणे भाष्य करत त्याच मत मांडलं आहे. शशांकच्या या पोस्ट पाहून संबंधित अधिकारी ही समस्या दूर करतील का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT