Premier

Shekhar Suman : शेखर यांच्या मुलाला होता 'हा' गंभीर आजार; लेकाच्या निधनानंतर उचललं गंभीर पाऊल

सकाळ डिजिटल टीम

हिरामंडीमधील नवाबाची भूमिका आणि नुकताच भाजपामध्ये केलेला प्रवेश यामुळे अभिनेते शेखर सुमन सध्या चर्चेत आहेत. संजय लीला भन्साळी यांचं दिग्दर्शन असलेल्या हिरामंडीमधील त्यांचा अभिनय गाजतोच आहे पण या प्रोमोशन दरम्यान त्यांनी त्यांच्या आयुष्यातील कठीण काळ सगळ्यांसोबत शेअर केला. त्यांच्या मोठ्या मुलाचं निधन झाल्यावर त्यांच्या आयुष्यातील त्या वाईट काळाला ते कसे सामोरे गेले हे त्यांनी यावेळेस सांगितलं.

फिल्मीज्ञानला दिलेल्या मुलाखतीमध्ये शेखर यांनी त्यांच्या या कठीण आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले,"माझा मुलगा आयुष माझी ताकद आहे. तो फक्त माझीच नाही तर आमच्या सगळ्यांची ताकद आहे. आम्ही त्याची कायम आठवण काढतो. तो खूप सुंदर मुलगा होता. त्याच्या सगळ्या आठवणी अजूनही माझ्या मनात ताज्या आहेत. तो खूप आजारी होता पण त्याने तसं कधी चेहऱ्यावर जाणवू दिली नाही. एकदा मी व्हिडीओ कॅमेरा घेऊन काहीतरी काम करत होतो. तो लगेच फ्रेममध्ये आला आणि मी जसं कॅमेऱ्यासमोर करत होतो तसा तो करू लागला."

शेखर सुमन यांना आयुष आणि अध्ययन ही दोन मुलं आहेत. यापैकी त्यांचा मोठा मुलगा आयुषचं तो लहान असतानाच निधन झालं. आयुषला एक दुर्मिळ आजार झाला होता ज्या कारणाने त्याचं वयाच्या ११ व्या वर्षी निधन झालं.

आयुषला एंडोमायकॉर्डियल मायक्रोफीबीस हा दुर्मिळ आजार झाला होता. भारतात तीन ते चार मुलं या आजाराचा सामना करत असतील. या आजारावर फक्त एकच उपाय आहे तो म्हणजे हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया. या व्यतिरिक्त त्यावर कोणतंही उपचार नाही. जेव्हा डॉक्टरांनी या आजाराचं निदान केलं तेव्हा आयुष फक्त आठ महिनेच जगेल असं शेखरला सांगितलं होतं.

"आयुषचे आजोबा पानी भूषण प्रसाद हे स्वतः एक हायप्रोफाईल डॉक्टर होते. ते देखील त्याचे प्राण वाचवू शकले नाहीत. जी घटना घडली त्यामुळे आमच्यावरही दुःखाचा डोंगर कोसळला होता. आम्ही अध्यात्माकडे वळलो, देवाची प्रार्थना करू लागलो पण कुणीच आयुषला वाचवू शकलं नाही. " असं शेखर यांनी एका मुलाखतीत सांगितलं. ज्या दिवशी आयुषचं निधन झालं तेव्हा शेखर रात्रभर त्याच्या मृतदेहाजवळ बसून होते. त्याच्या निधनाचा संपूर्ण कुटूंबाला खूप मोठा धक्का बसला होता. शेखर यांचा देवावरचा विश्वास उडाला होता. त्यांनी त्यांच्या देवघरातील सगळ्या देवांच्या मुर्त्या विसर्जित केल्याचंही एफएम कॅनडाला दिलेल्या मुलाखतीमध्ये शेअर केलं.

आयुषच्या निधनानंतर शेखर आणि त्यांच्या संपूर्ण कुटूंबाला या धक्क्यातून सावरायला बरीच वर्षं लागली. त्यानंतर त्यांनी काही काळ अभिनयक्षेत्रात काम करणंही थांबवलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT