shubhangi gokhale  esakal
Premier

सार्वजनिक गणेशोत्सव आता बंद झाला पाहिजे... शुभांगी गोखले यांचं स्पष्ट मत, म्हणाल्या- दारू पिऊन पत्ते खेळणं हे...

Shubhangi Gokhale On Ganeshotsav: लोकप्रिय मराठी अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी 'घरत गणपती' निमित्त सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल मांडलेलं मत अनेकांना पटलं आहे.

Payal Naik

दरवर्षी सगळे ज्या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात तो सण म्हणजे गणेशोत्सव. संपूर्ण देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाची भाविक मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत असतात. मुंबई पुण्यात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र अलीकडे या सणाला बीभत्स रूप येताना दिसतंय. काही लोक आपल्या मर्यादा सोडून वागताना दिसतात. यावर अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी आपलं रोखठोक मत मांडलं आहे. आपणच आपल्या देवाचा अपमान करतो असं त्यांनी म्हटलं आहे.

शुभांगी या मराठी सृष्टीतील एक दिग्गज अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक चित्रपटतात उत्कृष्ट अभिनय केला आहे. आता त्या 'घरत गणपती' या चित्रपटात दिसत आहेत. त्या निमित्ताने त्यांनी 'तारांगण' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना शुभांगी म्हणाल्या, 'मी मराठवाड्याची असल्याने गणेशोत्सवाच्या माझ्या अशा फारशा आठवणी नाही आहेत. पश्चिम महाराष्ट्रात घरोघरी गणपती असतो. मुंबईत अलीकडे बाहेरून आलेली माणसंसुद्धा गणपती बसवतात. नेपाळ, युपीवरून आलेले लोक सुद्धा गणेशोत्सव साजरा करतात. पण, खरा गणपती हा कोकणातला आहे.'

त्या म्हणाल्या, 'मराठवाड्यात एवढं स्तोम नाही. टिळकांनी सुरू केल्याने तेव्हा सार्वजनिक गणपतीचे मेळे व्हायचे. ते स्वरूप थोडं कमी होतं किंवा माझ्या वाटल्या एवढं काही आलं नाही. पुण्यात आल्यावर मी पाच मानाच्या गणपतींचं दर्शन घेतलं. त्यानंतर मुंबईतला गणेशोत्सव सुद्धा पाहिला. खरं सांगू का म्हणजे त्याचं फार अवडंबर झालं आहे. खूप चुकीच्या गोष्टी होतात. सार्वजनिक गणपती आपण मोठ्या भक्तिभावाने करतो. पण मला असं वाटतं आता आपण सार्वजनिक गणपती बंद केले पाहिजेत'.

त्या पुढे म्हणाल्या, 'रस्त्याच्या मध्यभागी तुम्ही गणेशोत्सव साजरा करता. पण, त्यानंतर रात्री तुम्ही दारू पिऊन पत्ते खेळणं वगैरे चालतं. हे तर कोणीच अमान्य करू शकत नाही. हे एकदम चुकीचं आहे. आपणच आपल्या देवाचा अपमान करतोय, सार्वजनिक गणपती आता बंद व्हायला हवाय. छोट्या- छोट्या गावांमध्ये आता सुबुद्धपणे एक गाव एक गणपती अशी प्रथा सुरू केली आहे. त्यामुळे आपण आता असे बदल केले पाहिजेत. सार्वजनिक गणेशोत्सवात सर्व प्रकारचं प्रदूषण होतं. मला वाटतं घरोघरी जो गणपती बसतो तो खूपच सुंदर असतो. कुणा- कुणाच्या घरचा गणपती सुद्धा मोठा असतो.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Visits Pune: डोनाल्ड ट्रम्प सुद्धा आहेत पुणेकर! जेव्हा फ्लॅट बघण्यासाठी आले अन् उभं केलं ट्रम्प टॉवर

Latest Marathi News Updates live : 'संविधान हे फक्त एक पुस्तक नाही' - राहूल गांधी

Donald Trump निवडून आले अन् नेटकऱ्यांनी विजयाचे क्रेडिट Elon Musk यांना दिले, सोशल मीडिया सुसाट.. भन्नाट मिम्स व्हायरल

ICC Test Rankings: मुंबईत बेक्कार हरले अन् कसोटी क्रमवारीत घसरले; विराट, रोहित तर टॉप २० मधून बाहेर फेकले गेले, Rishabh Pant...

PM Modi in Nashik : पंतप्रधानांच्या सभेसाठी शहर पोलिस सतर्क; आयुक्तालयातील बैठकीत कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन

SCROLL FOR NEXT