siddharth jadhav
siddharth jadhav  sakal
Premier

मराठीत साऊथसारखे चित्रपट का नाहीत? सिद्धार्थ जाधवने उत्तर देत केली बोलती बंद, व्हिडिओ एकदा पाहाच

सकाळ डिजिटल टीम

सध्या सगळीकडे दाक्षिणात्य चित्रपटांची चर्चा आहे. 'आरआरआर', 'पुष्पा' यांसारख्या चित्रपटांना प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत. आता बॉलिवूडही पुन्हा एकदा चांगले चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. या सगळ्यात मराठी सिनेमा कुठेतरी मागे राहतोय का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र अभिनेता सिद्धार्थ जाधवने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याबद्दल भाष्य केलं आहे. सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थने दिलेलं उत्तर ऐकून प्रत्येक मराठी माणसाचा उर अभिमानाने भरून येईल.

या मुलाखतीत सिद्धार्थ कननने प्रेक्षकांच्या लाडक्या सिद्धूला मराठी चित्रपटांबद्दल प्रश्न विचारला. मराठी चित्रपट कधी दाक्षिणात्य चित्रपटांसारखा पॅन इंडिया जाईल का असं त्याने विचारलं. त्यावर उत्तर देताना सिद्धार्थ म्हणाला, 'जातोच आहे. आता तुम्ही जी नावं घेतली ना त्यांना आम्ही गोल्ड माइन्स फिल्मवर पाहिलंय. त्यातून एक 'आरआरआर', एक 'पुष्पा' आणि एक 'के जी एफ' चालतायत. तुम्ही जेवढी नावं घेतली तेवढेच चित्रपट चालले. त्यानंतरही लायगर आला, टायगर आला नंदमुरी बाळकृष्णा यांचे चित्रपट आले ते कुठे चालले? चित्रपट येत आहेत पण चालतोय एखाद दुसरा.'

तुलना करणं चुकीचं

पुढे सिद्धार्थ म्हणाला, 'त्यामुळे त्यावरून तुलना करणं चुकीचं आहे. स्टायलाइज चित्रपट मराठी आणि हिंदी मध्येही बनतात. ते साऊथमध्येही बनतच होते. माझ्या मराठी चित्रपटाची स्पर्धा ना हिंदीशी आहे ना साऊथशी आहे. आम्ही इंटरनॅशनल लेव्हलला जातोय. ही एकाच घरातली चार मुलं आहेत सर. एक आयटीमध्ये आहे, कुणी बिझनेस करतंय. प्रत्येकजण आपापलं काम करतंय. तुझा मोठा भाऊ काय करतोय बघ, तुझा मोठा भाऊ आर जे आहे, तू काय करतोयस इथे? असं नाही होत ना. तुमची जी क्वालिटी आहे तुम्ही तेच करणार ना.'

तुम्ही साऊथवाल्यांना नाही विचारणार

सिद्धार्थ म्हणाला, 'आमचा मराठी चित्रपट कनेक्शन बघतो. आमचेही मराठी चित्रपट हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळममध्ये डब होऊन रिलीज होतायत. हळूहळू होईल. यूएस, दुबई, कुवैत इथे प्रदर्शित होतात मराठी चित्रपट. आदित्य सरपोतदार, केदार जाधव, महेश मांजरेकर, संजय जाधव यांसारखे दिग्दर्शक आहेत जे भारी आहेत. महेश मांजरेकरांचा 'जुनं फर्निचर' हा चित्रपट पाहून तुम्ही साऊथवाल्यांना नाही विचारणार असा चित्रपट का नाही बनवला? मराठी सिनेमा रोमँटिक आहे, कन्टेन्ट बघतो. हळूहळू होतंय. आता तुम्ही मला धावायला सांगाल तर ते मला नाही जमणार. मी माझ्या वेगानेच जाईन.' सिद्धार्थचं हे उत्तर ऐकून अनेक नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant: "तुम्ही माझ्या आईला फोन केला अन्..."; PM मोदींसोबत बोलताना ऋषभ पंतने व्यक्त केल्या भावना

Rahul Dravid : ती वेळ चांगली नव्हती.... पंतप्रधान मोंदीना भेटीवेळी द्रविड वनडे वर्ल्डकप फायनलबद्दल काय म्हणाला?

Team India: ढोल-ताशा अन् लेझीमच्या गजरात रोहितसह टीम इंडियाच्या खेळाडूंचं विधानभवनात स्वागत, पाहा Video

Yashasvi Jaiswal: संस्कार! यशस्वी जैस्वालनं एकनाथ शिंदेच्या पाया पडून जिंकले मन, वर्षा बंगल्यावरील Video Viral

जस्टिन बिबरसोबत अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात परफॉर्म करणार 'हे' कलाकार, नेटकरी म्हणतात- अंबानींनी तर...

SCROLL FOR NEXT