Aarya Ambekar
Aarya Ambekar Esakal
Premier

Aarya Ambekar : आर्याला संगीतक्षेत्रात नाही तर 'या' क्षेत्रात करायचं होतं करिअर

सकाळ डिजिटल टीम

Singer Aarya Ambekar : गोड आवाजाबरोबरच तिच्या लाघवी सौंदर्यासाठी ओळखली जाणारी गायिका आर्या आंबेकर सोशल मीडियावरही खूप चर्चेत असते. तिचे सोशल मीडियावर अनेक फॉलोअर्स असून तिच्या विषयीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. आर्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये तिला गायिका नाही तर इतर क्षेत्रात करिअर करायचं होतं असं शेअर केलं.

आर्याला करायचं होतं 'या' क्षेत्रात करिअर

आर्या आंबेकरने नुकतीच राजश्री मराठीच्या तिची गोष्ट या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी तिने तिच्या करिअरबाबत महत्त्वाचा खुलासा केला. आर्या म्हणाली,"मला कायमच डॉक्टर बनायचं होतं. मी लहान असताना माझ्या आजीने मला अनेक गाणी शिकवली होती. लहान असल्यापासून मी आईकडे गाणं शिकायचे. सहाव्या वर्षी मी गाण्याची पहिली परीक्षा दिली. त्यानंतर मी शाळेतूनही विविध गाण्यांच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे. असं असूनही मी कधीच गाण्याचा करिअर म्हणून विचार केला नव्हता मला डॉक्टर व्हायचं होतं. पण सारेगमपचे आभार कि त्यांनी मला संगीतक्षेत्रातील संधी दाखवली. त्यानंतरच माझा निर्णय बदलला."

आर्या ही अतिशय हुशार असून लहानपणापासून तिला डॉक्टर व्हायचं होतं पण नंतर तिने तिचा निर्णय बदलत संगीतक्षेत्रात स्वतःचं करिअर करायचं ठरवलं.

आर्याचं शिक्षण

आर्याने फर्ग्युसन कॉलेजमधून बी ए केलं असून त्यावेळी तिने अर्थशास्त्र विषयात पदवी घेतली होती तर नंतर तिने संगीत विषयात एम ए केलं. विशेष म्हणजे ती एम ए मध्ये संपूर्ण युनिव्हर्सिटीमधून पहिली आली होती आणि तिला गोल्ड मेडल मिळालं होतं आणि तिने साऊंड इंजिनिअरिंगचा सर्टिफिकेट कोर्सही पूर्ण केला आहे.

गाजलेली गाणी

आर्याने आजवर मराठी भाषेत अनेक गाणी गायली असून तिची काही गाणी सुपरहिट झाली आहेत. 'जरा जरा','केवड्याचं पान तू','बाई गं' ही तिची गाणी खूप गाजली होती. याशिवाय तिने 'ती सध्या काय करते' या सिनेमात अभिनयही केला होता. अभिनय बेर्डेबरोबर तिने या सिनेमात स्क्रीन शेअर केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cow Milk Rate: दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; प्रतिलिटर 35 रुपये दर जाहीर

Ladaki Bahin Scheme: महिलांच्या मागणीनंतर 'लाडकी बहीण' योजनेला मुदतवाढ! अजित पवारांची सभागृहात घोषणा

Hathras stampede: सत्संगातील मृतदेहांचा खच पाहून आला हृदयविकाराचा झटका, जवानाचा जागेवरच मृत्यू...

IPL 2025 Auction : रिटेंशनवरून कोणताही तोडगा नाही; खेळाडू संख्येवरून फ्रेंचायजी एकमेकांशीच भिडले

Hathras stampede: हाथरसमध्ये हाहाकार! "माझी मुलगी कुठेच सापडली नाही", आईची शोधाशोध...वाचा प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT