Pravin Tarde and Snehal Tarde  Esakal
Premier

Snehal Tarde praised Pravin : पत्नी स्नेहलला पती प्रवीण तरडेंचा अभिमान, म्हणते "कोणतही व्यसन नसताना.."

सकाळ डिजिटल टीम

Snehal Tarde Interview : सध्या आगामी 'धर्मवीर २' चित्रपटाची सर्वत्र चर्चा आणि उत्सुकता आहे. धर्मवीर हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला. चित्रपटातील डायलॉग आणि गाणी देखील लोकप्रिय ठरली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरने उत्कंठा वाढवली आहे. दुसऱ्या भागाचही दिग्दर्शन प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केलय. प्रवीण तरडे यांच्या पत्नी स्नेहल तरडे यांनी पहिल्या भागात महत्त्वाची भूमिका साकारली होती. नुकताच 'धर्मवीर २' या चित्रपटाचा संगीत अनावरण आणि ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी स्नेहलने पती प्रवीण तरडे यांचं कौतुक केलं.

सकाळ समुहाला दिलेल्या मुलाखतीत स्नेहलने पती प्रवीण तरडे यांचं तोंडभरुन कौतुक केलय. प्रवीण तरडे यांच्या कामाच्या पद्धतीविषयी विचारलं असता स्नेहल म्हटली की,"प्रवीण हा पूर्णपणे चित्रपटांमध्ये स्वत:ला झोकून देणारा व्यक्ति आहे. त्याचं सुरुवातीपासूनच तसच आहे. आधी तो चित्रपट करत नव्हता नाटक करत होता. एकांकिका असेल किंवा मालिकांचं लेखन असेल, तो जे काम असेल त्यात स्वत:ला शंभर टक्के झोकून देतो. आता सगळ्यांना माहितीय की घराकडे पण त्याचं लक्ष नसतं. पत्नी म्हणून थोडसं दु:ख होणं स्वाभाविक आहे पण मी त्यासोबतच अभिनेत्री पण आहे. मला या गोष्टीचा आनंद आणि अभिमानही वाटतो की माझ्या नवऱ्याला कोणतही व्यसन नाही. फक्त काम एके काम, या क्षेत्रात स्वत:ला झोकून द्यायचं. अशा व्यक्ति पण समाजात कमी होत चालल्या आहेत. अशी व्यक्ति माझा नवरा आहे याचा फार अभिमान वाटतो."

नाटकांमध्ये एकत्र काम करत असताना प्रवीण तरडे आणि स्नेहल यांची ओळख झाली. नंतर दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अनेक संघर्षाला सामोरं जात प्रवीण आणि स्नेहल यांची सुखाचा संसार थाटला. सध्या मराठी सिनेसृष्टीत दोघांना त्यांच्या कामामुळे लोकप्रियता मिळतेय. शिवाय एक आदर्श जोडी म्हणून दोघांकडे पाहिलं जातं.

पहा पूर्ण मुलाखत

'धर्मवीर २' मध्येही स्नेहल तरडे महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. शिवाय 'धर्मवीर २' साठी स्नेहलने गीतकार म्हणून काम केलय. हा चित्रपट मराठीसह हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे हिंदी भाषेतील चित्रपटाचं टायटल ट्रॅक 'ऐसा ये धर्मवीर' हे स्नेहलने लिहीलय. अविनाश - विश्वजीत यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं असून गायक मनीष राजगिरे यांनी गायलय. येत्या ९ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र सध्या राज्यात होत असलेली अतिवृ्ष्टी आणि पूरपरिस्थिती लक्षात घेता चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. लवकरच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrakant Patil Convoy Accident : मध्यरात्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील गाडीला कोणी धडक दिली ? पुण्यात नेमकं काय घडलं

Latest Maharashtra News Updates : व्हायरसचा प्रसार होऊ नये यासाठी सर्व उपाय सुरू : आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज

Rohit Sharma: 'सर्वच खेळाडू सर्व सामने खेळणार, हे शक्य नाही...', कर्णधार रोहित IND vs BAN कसोटीपूर्वी हे काय म्हणाला?

Ganesh Visarjan 2024 LIVE : परशुराम ढोल ताशा पथक टिळक चौकात दाखल

Maratha Reservation : सरकार मराठा समाजाची दिशाभूल करणार नाही, जरांगे पाटलांचे उपोषण अन् CM शिंदेंचे मराठवाड्याला आश्वासन

SCROLL FOR NEXT